Join us

मलायका अरोराने अपघातानंतर पहिल्यांदा शेअर केला फोटो, म्हणाली - 'मी योद्धा आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:52 IST

Malaika Arora : मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लांबलचक नोट लिहिली आहे. ज्यात अपघाताबाबत लिहिलं आहे. फोटोत मलायका खिडकीतून बाहेर बघताना दिसत आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora) च्या अपघाताची बातमी समोर आली अन् तिचे फॅन्स घाबरले. या अपघातात मलायका जखमी झाली होती. अपघातानंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुदैवाने तिला जास्त काही झालं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. मलायका सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. पण अपघातानंतर ती सोशल मीडियापासून दूर होती. आता अपघातानंतर तिने पहिल्यांदाच एक फोटो शेअर केला आहे. 

मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लांबलचक नोट लिहिली आहे. ज्यात अपघाताबाबत लिहिलं आहे. फोटोत मलायका खिडकीतून बाहेर बघताना दिसत आहे. पण तिचा पूर्ण दिसत नाहीये.

मलायकाने लिहिलं की, 'गेल्या दिवसातील घटना फार अविश्वसनीय आहेत. त्यांबाबत विचार करणंही एखाद्या सिनेमाच्या सीनप्रमाणे वाटतात. पण त्या प्रत्यक्षात घडल्या आहेत. अपघातानंतर लगेच मला जाणवलं की, मी खूपसाऱ्या एंजल्सच्या निरीक्षणाखाली आहे. मग ते माझे कर्मचारी असो, ज्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले ते असो, माझा परिवार जो माझ्यासोबत उभा आहे आणि अद्भुत हॉस्पिटल कर्मचारी'.

मलायकाने सर्वांचे धन्यवाद मानत पुढे लिहिलं की, 'माझ्या डॉक्टरांनी माझी खूप काळजी घेतली. त्यांनी मला सुरक्षित असल्याची जाणीव दिली. ज्यासाठी मी त्यांची आभारी आहे. मग माझे मित्र, परिवार, माझी टीम आणि माझा इन्स्टा परिवाराकडून जे प्रेम मिळालं ते अविश्वसनीय आहे. अशावेळी तुम्हाला खूप प्रेमाची गरज अससते. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. मी एका नव्या जोशाने समोर आली आहे. मी ठीक होत आहे. मी एक योद्धा आहे'.

पोस्ट शेअर केल्यावर लगेच तिचे फ्रेन्ड्स आणि फॅन्स तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. करीना कपूर खानने बायसेप्स आणि हार्ट इमोजी शेअर केला. तर करिश्मा कपूरने हार्ट इमोजी शेअर केला. संजय कपूरने लिहिलं 'ब्रेव्हहार्ट'. 

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटी