Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोराने शेअर केला हॉट फोटो, अर्जुन कपूरकडे केला लडिवाळा हट्ट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 11:44 IST

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या लव्ह लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या अफेअरच्या रोज काही तरी नव्या चर्चा ऐकायला मिळतात.

ठळक मुद्देज्यात ती स्विमिंग सूट मध्ये वाटर बाईक चालवताना दिसतेयया फोटोला 20 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या लव्ह लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या अफेअरच्या रोज काही तरी नव्या चर्चा ऐकायला मिळतात. लव्ह लाईफसोबतच मलायका आपल्या फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी देखील चर्चेत रहाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मलायका फॅन्ससोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. असाच एक फोटो मलायकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती स्विमिंग सूट मध्ये वाटर बाईक चालवताना दिसतेय. मलायका या फोटोत भलतीच हॉट दिसतेय.  

फोटो पाहुन तो मालदीवमध्ये व्हॅकेशन दरम्यान काढण्यात आल्याचा अंदाज आहे. या फोटोला मलायकाने एक कॅप्शन देखील दिले आहे,'टेक मी बॅक' असे तिने लिहिले आहे. तिच्या फॅन्सनी या फोटोला पसंती दिली आहे. काही तासांपूर्वी टाकण्यात आलेल्या या फोटोला 20 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.      

मलायकाचा हा फोटो गेल्या महिन्यातील तिच्या मालदिवममधल्या व्हॅकेशन दरम्यानचा आहे. या व्हॅकेशनमध्ये तिच्यासोबत अर्जुन कपूर देखील असल्याची चर्चा रंगली होती. मलायका आणि अर्जुन बी-टाऊनमधील अनेक इव्हेंटना एकत्र दिसतात. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये आहे. मात्र मलायका आणि अर्जुनने त्या फेटाळून लावल्या आहेत.   

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर