Join us

लॉकडाऊनमध्ये आपल्या कुत्र्यासोबत रस्त्यावर फिरली ही अभिनेत्री, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 17:24 IST

अभिनेत्री आपल्या कुत्र्याला फिरवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या अभिनेत्रीला सोशल मीडियावर चांगलेच सुनावले जात आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओत मलायका अरोरा तिच्या कुत्र्याला घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिने मास्क लावलेला दिसत असला तरी ती काहीही कारण नसताना फिरत असल्याने नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत.

देशात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दररोज तीन लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. अनेकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून लोकांनी काही महत्त्वाचे कारण असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे लोकांना सरकारकडून सांगितले जात आहे. पण अशा परिस्थितीत देखील एक अभिनेत्री आपल्या कुत्र्याला फिरवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या अभिनेत्रीला सोशल मीडियावर चांगलेच सुनावले जात आहे.

या व्हिडिओत मलायका अरोरा तिच्या कुत्र्याला घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिने मास्क लावलेला दिसत असला तरी ती काहीही कारण नसताना फिरत असल्याने नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. 

योगेश शहाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सरकार कोरोना रोखण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असताना या सेलिब्रेटींना काहीही पडलेले नाहीये अशी लोक कमेंट करत आहेत. तसेच पाळीव प्राण्यांना फिरवणे हे अत्यावश्यक सेवेत येते का असा प्रश्न देखील सोशल मीडियाद्वारे विचारला जात आहे. 

टॅग्स :मलायका अरोरा