Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सापडला मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाचा मुहूर्त! कसा, कुठे ते वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 13:14 IST

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची डेट आली समोर, खुद्द तिनेच असे दिले संकेत

मलायका अरोरा लॉकडाउनमध्ये तिच्या घरातच आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो व व्हिडिओ शेअर करताना दिसते. कदाचित तिला या लॉकडाउनमध्ये व्हॅकेशनची आठवण येते आहे. तिने एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बीचवर गोल गोल फिरताना दिसते आहे. वाळूवर काहीतरी लिहिले आहे जे पाहून चाहते तर्कवितर्क लावत आहेत.

मलायका अरोराला समुद्राच्या ठिकाणी फिरायला खूप आवडते. ती नेहमी व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. कोरोनामुळे कुठे जाता येत नसल्यामुळे तिने जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले की, सूर्याच्या प्रकाशात फिरते आहे, माझे पाय यासाठी पुढे टाकत आहे कारण जिथून चालले आहे तिथेच परत जाऊ. जगदेखील या कंट्रोलच्या बाहेर चक्करशी फिरून परत त्या जागी येईल आणि आशा आणि आनंदाने सूर्य आपल्या सगळ्यांना रोशन करेल.

मलायकाच्या या व्हिडिओला खूप लाइक्स मिळाले. मात्र या व्हिडिओतील एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जे पाहून सगळे तर्कवितर्क लावत आहेत. या वाळून सेव्ह द डेट असं काहीतरी लिहिलंय आणि त्याखाली डेट लिहिली आहे. या व्हिडिओवर लोकांनी कमेंट्स केली आहे की ही मलायकाच्या लग्नाची तारीख आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच कालावधीपासून अफेयरमुळे चर्चेत आहेत. लोक त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. अद्याप याबद्दल त्यांनी ऑफिशिएली काहीच सांगितलेले नाही. मात्र ते सोशल मीडियावर चाहत्यांना हिंट देत असतात.

मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांच्या डेटिंगच्या चर्चा 2018 पासून सुरू आहेत. लॉकडाउनच्या आधी बऱ्याचदा त्या दोघांना लंच व डिनर डेटला जाताना पाहिले आहे. अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकाने अर्जुनसोबत हात पकडलेला फोटो शेअर केला होता. तेव्हा तिने ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची हिंट दिली होती. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर