‘काला चश्मा’ चे ‘मेकिंग आॅफ’ व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 10:48 IST
सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांचे ‘काला चश्मा’ हे गाणे सर्वत्र पसंत केले जात आहे. या गाण्याला यूट्यूबवर ४० मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे पार्टी मूडमधील असून सर्वांना उत्सुकता लागलीच होती की, हे गाणे शूट करताना किती मजा आली असेल?
‘काला चश्मा’ चे ‘मेकिंग आॅफ’ व्हायरल !
सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांचे ‘काला चश्मा’ हे गाणे सर्वत्र पसंत केले जात आहे. या गाण्याला यूट्यूबवर ४० मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.हे गाणे पार्टी मूडमधील असून सर्वांना उत्सुकता लागलीच होती की, हे गाणे शूट करताना किती मजा आली असेल? म्हणून नुकतेच या गाण्याचे ‘मेकिंग आॅफ’ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.करण जोहरने हा मेकिंग आॅफचा व्हिडीओ शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ द मेकिंग आॅफ द पार्टी स्टार्टर!’ हे गाणे अमर अर्शी याने गायले असून बादशाहने पेपी नंबरमध्ये रूपांतरित केले आहे. बॉस्को-सीजर यांची कोरिओग्राफी या गाण्याला असल्याने गाण्यातील युनिक स्टेप्स तरूणाईला आकर्षित करत आहेत.">http://