Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण'मध्ये दीपिका पादुकोणसोबत महेश बाबूची झाली एंट्री, हृतिक रोशनचा पत्ता होणार कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 14:52 IST

मधु मंटेना यांचा '3D रामायण' सिनेमा सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

 मधु मंटेना यांचा '3D रामायण' सिनेमा जबरदस्त चर्चेत आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चा होती. यापूर्वी असे म्हटले जात होते की, सिनेमात हृतिक प्रभू रामच्या भूमिकेत दिसणार असून दीपिका माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार कलाकारांची निवड बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार साउथचा सुपरस्टार महेश बाबूची या सिनेमात एंट्री झाली आहे. महेश बाबू या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसू शकतो.  

मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण सुपरस्टार महेश बाबूला या सिनेमासाठी अप्रोच करण्यात आले  आहे.  '3D रामायण'मध्ये हृतिक रोशन 'राम' च्या भूमिकेत दिसणार नाही.  सध्या महेश बाबूबरोबर चर्चा सुरू आहे. महेश बाबूलाही याची पटकथा आवडली आहे. तथापि, यासाठी त्याने अद्याप होकार दिलेला नाही. हृतिकसारख्या मोठ्या स्टारकडून सिनेमातील मुख्य भूमिका का काढून येण्यात आली असा प्रश्न उपस्थित राहतो.  सुरुवातीपासूनच अशा बातम्या आल्या होत्या की हृतिक रामची भूमिका साकारताना दिसणार आहे.

 मधुला स्टारकास्टसाठी KWAAN एजन्सीची मदत मिळते आहे. असे सांगितले जात आहे की, हृतिक रोशनने या सिनेमात खलनायकची भूमिका साकारण्यासाठी होकर दिला आहे.  रिपोर्ट्सनुसार तो 'रावण'ची भूमिका साकारणार आहे. परंतु, या सर्वांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

टॅग्स :महेश बाबूहृतिक रोशनदीपिका पादुकोण