४० कोटींचं बजेट असलेल्या 'महावतार नरसिम्हा' या अॅनिमेटेड सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटींमध्ये कमाई करत आहे. सिनेमाचं बजेट 'महावतार नरसिम्हा'ने पहिल्याच आठवड्यात वसूल केलं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची चलती आहे. हॉलिवूडच्या सुपरहिरोंनाही 'महावतार नरसिम्हा'ने मागे टाकलं आहे.
भक्त प्रल्हादाची असिम भक्ती आणि त्याचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर नरसिम्हाचा अवतार घेऊन अवतरलेल्या विष्णू भगवान यांची कथा 'महावतार नरसिम्हा' सिनेमातून दाखविण्यात आली आहे. या अॅनिमेटेड सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेमही मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने ४४.७५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने १७ दिवसांत २०० कोटींचा आकडा पार केला आहे. आत्तपर्यंत 'महावतार नरसिम्हा'ने जगभरात २१३ कोटींचं कलेक्शन केलं आहे.
'महावतार नरसिम्हा' सिनेमा २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. २०३७ पर्यंत महावतार सिनेमांची सिरीज येणार आहे. 'महावतार नरसिम्हा' नंतर आता या सिनेमांच्या प्रतिक्षेत आहेत.