शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हा एकच प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनता विचारतेय. सोशल मीडियाने मात्र हा गुंता सोडवत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी अभिनेता अनिल कपूरचे नाव सुचवले आहे. होय, अनिल कपूरला मुख्यमंत्री करा, असा पर्याय नेटक-यांनी पुढे केला आहे. ‘ शिवसेना-भाजपातील मुख्यमंत्रिपदावरून सुरु असलेला गुंता सुटत नाही तोपर्यंत अभिनेता अनिल कपूरला मुख्यमंत्री बनवू पाहू शकतो. पडद्यावर त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ संपूर्ण देशाने बघितला आहेच. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे तुमचा काय विचार आहे?, ’ असे ट्विट विजय गुप्ता नामक एका ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.
काय म्हणता? अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 14:14 IST
शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हा एकच प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनता विचारतेय.
काय म्हणता? अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर !!
ठळक मुद्दे‘नायक’ या चित्रपटात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनला होता. 2001 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.