अभिनय आणि सौंदर्याने आजही माधुरी दीक्षित चाहत्यांना घायाळ करते. ९०चं दशक गाजवलेली माधुरी आजही चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करते. माधुरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अनेकदा ती ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओही बनवते. सध्या सगळीकडे पावसाने मौसम मस्ताना असताना माधुरीने रील बनवला आहे.
माधुरीने 'हम आपके है कौन' सिनेमातील "यै मौसम का जादू है मितवा..." या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. छत्री घेऊन पावसात माधुरीने रील बनवला आहे. या व्हिडिओत तिने निसर्गाचा नजराणाही चाहत्यांना दाखवला आहे. माधुरीने तिच्या या एव्हरग्रीन गाण्यावर रील बनवल्याने चाहते खूश झाले आहेत. त्यांनी अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
'हम आपके है कौन' हा माधुरी दीक्षितचा गाजलेला सिनेमा आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित, सलमान खान, रेणुका शहाणे, अनुपम खेर, आलोक नाथ, रीमा लागू अशी स्टारकास्ट होती. या सिनेमातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. सूरज बडजात्या यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. १९९४ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे.