Join us

मधु मंटेना त्रिवेदी! फिल्ममेकरने नावापुढे लावलं पत्नीचं आडनाव; ९ वर्ष लहान मुलीशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 13:24 IST

मधु मंटेना यांचं इन्स्टाग्राम प्रोफाईल चेक केलं असता त्यांनी बायो मध्ये...

मधु मंटेना (Madhu Mantena) आणि ईरा त्रिवेदी (Ira Trivedi) गेल्या रविवारी लग्नबंधनात अडकले. जवळच्या मित्र परिवाराच्या साक्षीने लग्नसोहळा पार पडला. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. आमिर खान, अनिल कपूर, राकेश रोशन, अनुपम खेर आणि सोनाली बेंद्रे सह अनेक बॉलिवूड तारेतारकांनी लग्नाला हजेरी लावली. मधु मंटेना यांनी तेव्हापासूनच इन्स्टाग्रमवर नावात बदल करत मधु मंटेना त्रिवेदी असं केलं आहे. नावापुढे पत्नीचं आडनाव लावल्याने मधु मंटेनाने लक्ष वेधून घेतलंय.

मधु मंटेना आणि ईरा त्रिवेदी हे न्यूली वेड कपल मालदीव्ह्ज येथे हनिमूनसाठी पोहोचले. यावेळी मधू मंटेन यांनी ईराचा स्विमवेअरमधला एक फोटो शेअर केला. 'मला सांगायचंय की माझी पत्नी मालदीव एव्हढीच सुंदर आहे.' तर आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले,'मी फक्त माझ्या पत्नीला घेऊन शो ऑफ करत आहे.' इरा या फोटोंमध्ये पावर योग शीर्षासन करताना दिसत आहे.

मधु मंटेना यांचं इन्स्टाग्राम प्रोफाईल चेक केलं असता त्यांनी बायो मध्ये 'मधु मंटेना त्रिवेदी' असं लिहिलं आहे. सध्या दोघंही मालदीव्हज मध्ये हनिमूनचा आनंद घेत आहेत. तर मधू मंटेना आपल्या पत्नीवरचे प्रेम व्यक्त करत आहेत. मधू मंटेना इरा त्रिवेदीहून ९ वर्ष मोठे आहेत. त्यांचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासह लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

टॅग्स :लग्नबॉलिवूड