Join us
Daily Top 2Weekly Top 5

मधु मंटेना इतक्या कोटींमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला घेऊन बनवणार रामायण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 14:39 IST

मधु मंटेना यांनी चित्रपटासाठी अनेक ए-लिस्ट कलाकारांची नावे निश्चित केली आहेत.

बर्‍याच दिवसांपासून 'रामायण' वर सिनेमा तयार करण्यात येणार अशी  चर्चा आहे. निर्माता मधु मंटेना बिग बजेटसह 'रामायण'वर सिनेमा बनवण्याच्या तयारीत  आहेत, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण राम आणि सीता यांच्या मुख्य भूमिकेत दिसतील.

'स्पॉटबॉय' च्या रिपोर्टनुसार अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि विकास बहल यांच्याकडून नुकत्याच फॅन्टम फिल्मस शेअर्स खरेदी करणारे मधु मंटेना  यांना 300 कोटींपेक्षा जास्त बजेटमध्ये थ्रीडी रामायण तयार करायचे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आमिर खानच्या 'दंगल'चे दिग्दर्शक नितेश तिवारी या सिनेमाचे दिग्दर्शन करू शकतात. 

असे म्हटले जात आहे की मधु मंटेना यांनी चित्रपटासाठी अनेक ए-लिस्ट कलाकारांची नावे निश्चित केली आहेत पण राम आणि सीता यांच्या भूमिकेसाठी  दीपिका पादुकोण  आणि ह्रतिक रोशनचे नाव समोर येतायेत.  आता हे पाहावं लागेल की दीपिका आणि ह्रतिकचे नाव फायनल होते की नाही. 

दीपिकाकडे सध्या अनेक बिग बजेट सिनेमा आहेत. शाहरुख खानसोबत ती 'पठाण'मध्ये झळकणार आहे. नंतर प्रभास बरोबर नाग अश्निवीच्या बहुभाषिक सिनेमात काम करत आहे. ह्रतिक रोशनसोबत ती 'धूम 4'मध्ये देखील झळकण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणहृतिक रोशन