Join us  

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅननच्या ‘लुका छुपी’ने दुसऱ्याच आठवड्यात केले बॉक्स ऑफिसवर इतके कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 9:00 PM

लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ करोडचा गल्ला जमवला होता

ठळक मुद्देफिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, लुका छुपी या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.या चित्रपटाने आतापर्यंत ५३.७० करोड इतकी कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. 

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन यांचा ‘लुका छुपी’ हा सिनेमा १ मार्चला प्रदर्शित झाला असून या दोघांसोबतच या चित्रपटात पंकज त्रिपाठी, विनय पाठक, अपारशक्ती खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे ‘मथुरा लाईव्ह’ असे नामकरण आधी करण्यात आले होते. पण पुढे ते बदलून ‘लुका छुपी’ असे ठेवण्यात आले. हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित असून हा कॉमेडी फॅमिली ड्रामा रोहन शंकर यांनी लिहिला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकरने केले आहे. 

लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ करोडचा गल्ला जमवला होता आणि आता तर या चित्रपटाने ५० कोटीचा टप्पा पार केला आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, लुका छुपी या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यात नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे लुका छुपी या चित्रपटाला मिळालेल्या स्क्रीन कमी झाल्या असल्या तरीही शुक्रवारी ८.०१ करोड, शनिवारी १०.०८ करोड, रविवारी १४.०४ करोड, सोमवारी ७.९० करोड, मंगळवारी ५.०४ करोड, बुधवारी ४.६० करोड, गुरुवारी ४.०३ करोड इतके या चित्रपटाचे कलेक्शन झाले. या चित्रपटाने आतापर्यंत ५३.७० करोड इतकी कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. 

 

लुका छुपी या चित्रपटाचे समीक्षकांनी देखील कौतुक केले होते. तसेच ही आकडेवारी पाहाता प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे असेच म्हणावे लागेल. पण याच्या तुलनेत सोनचिडिया या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करणे खूपच कठीण जात आहे. सोनचिडिया या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला समीक्षकांनी डोक्यावर घेतले असले तरी या चित्रपटाला पहिल्या दोन दिवसांत केवळ २ कोटींचाच गल्ला जमवता आला होता. 

लुका छुपी या चित्रपटात कार्तिक आर्यन ग्वाल्हेरमधील एका मुलाची भूमिका साकारताना दिसत आहे. २५ कोटी खर्चून तयार झालेला हा चित्रपट देशभरातील ३००० स्क्रिन्सवर रिलीज झाला होता. ‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुका छुपी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे. 

टॅग्स :लुका छुपीकार्तिक आर्यन