Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्याच्या नातीचे फोटो पाहून विसराल तैमुरला, आहे ती अतिशय सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 19:00 IST

या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देहा फोटो बोमन इराणी यांच्या नातीचा असून या फोटोत ती गोड हसताना दिसत आहे. त्यांच्या नातीचे नाव सायशा असून त्यांच्या नातीचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी डरना मना है या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बोमन यांनी आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. बोमन सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या चित्रपटांच्या पोस्टरचे, चित्रीकरणाचे फोटो, व्हिडिओ ते पोस्ट करत असतात. पण त्याचसोबत त्यांच्या खाजगी आयुष्यातील फोटो देखील आपल्याला त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. त्यांच्या आईसोबतचे, मुलांसोबतचे अनेक फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. 

बोमन इराणी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो त्यांच्या नातीचा असून या फोटोत ती गोड हसताना दिसत आहे. त्यांच्या नातीचे नाव सायशा असून त्यांच्या नातीचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

ऑफिशिअल ह्युमन्स ऑफ बॉम्बे या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर बोमन इराणी यांचा स्ट्रगल आपल्याला काही दिवसांपूर्वी वाचायला मिळाला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, मी जन्माच्याआधीच माझ्या वडिलांचे निधन झाले होते. ते एक वेफर्सचे दुकान चालवत असत. त्यांच्या निधनानंतर माझ्या आईने हे दुकान सांभाळायला सुरुवात केली. माझ्या बहिणी शाळेत जायच्या आणि माझ्या आईला दुकानात जायचे असायचे. त्यामुळे मला देवळातील पुजाऱ्याच्या पत्नीकडे ती ठेवायची. अनेक वर्षं तिने एकटीनेच घर चालवले.

मी शाळा संपल्यानंतर विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. पण शिक्षणापेक्षा नाटक आणि इतर कलांमध्ये मला अधिक रस होता. मी कॉलेज झाल्यावर नोकरी करायला सुरुवात केली. मी ताज हॉटेलमध्ये रूम सर्विसचे काम करत होतो. त्यानंतर दीड वर्षांनी मला तिथे वेटर म्हणून काम करायला मिळाले. पण माझ्या आईचा अचानक अपघात झाला आणि मी नोकरी सोडून दुकान सांभाळायला लागलो. मी अनेक वर्षं दुकानाच्या कामातच व्यग्र होतो. त्या दरम्यान माझे लग्न झाले, मला मुलं झाली. मी दुकान व्यवस्थितपणे चालवत असलो तरी एक गोष्ट मी चांगलीच मिस करत होतो. माझे वडील फोटोग्राफर होते आणि मला देखील फोटोग्राफीची प्रचंड आवड होती आणि त्यामुळे मी या क्षेत्रात करियर करावे असे मला वाटत होते. यासाठी माझ्या पत्नीने मला प्रोत्साहन दिले. काही वर्षं स्ट्रगल केल्यानंतर मला या क्षेत्रात चांगलेच यश मिळाले. फोटोग्राफी करत असताना माझा एक मित्र मला एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी घेऊन गेला आणि माझी त्यासाठी निवड झाली. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो.