Aaradhya’s surely got the moves! At her Annual Day Function a few minutes ago pic.twitter.com/9Q7wlDKXHB— Bewitching Bachchans (@TasnimaKTastic) December 16, 2017
स्टेजवर चिमुकली आराध्या पांढरा आणि लाल रंगाच्या शॉर्ट फ्रॉकमध्ये दिसलेय. तिच्यासारखाच तिचा डान्सही क्यूट आहे, हे सांगायला नकोच. निश्चितपणे मुलीचा स्टेजवरचा हा परफॉर्मन्स पाहून ऐश्वर्याचा ऊर भरून आला असणार. या व्हिडिओमध्ये आराध्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. पण थोडे काळजीपूर्वक पाहिल्यावर तुम्ही तिला ओळखू शकता.
अन्य एका व्हिडिओत शाहरूखचा लाडका अबराम दिसतोय. आराध्याची एक झलकही यात पाहायला मिळतेय. या व्हिडिओत ओम शांती ओम या गाण्यावर धीरूबाई अंबानी स्कूचीस सगळी मुले डान्स करताहेत. उपस्थितांमध्ये शाहरूखही काही डान्स स्ेटप करताना दिसतोय. लाडका अबरामही यात थिरकताना दिसतोय. तिकडे ऐश्वर्याही ताल धरताना दिसतेय. एकंदर काय तर अबराम असो वा आराध्या दोघेही आपल्या सेलिब्रिटी मॉम, डॅडपेक्षा कुठेही कमी नाहीय, हेच यावरून दिसते. या धम्माल अॅन्युअल डेचा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा आणि कसा वाटला, तेही आम्हाला सांगायला हवे.