Join us  

लूक हॅँडसम, करिअर मात्र फ्लॉप!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:46 PM

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे बरेच न्यू कमर अ‍ॅक्टर्स असा विचार करतात की, बॉडी आणि लुक्स अगोदरपासूनच तयार करून घेतले तर अ‍ॅक्टिंगमध्येही यश नक्कीच मिळेल, मात्र असे होत नाही.

-रवींद्र मोरेबॉलिवूड अ‍ॅक्टर्स जरी स्टाइल आणि लुक्सच्या बाबतीत आयकॉन असतील, मात्र त्यांच्या यशाचे सिक्रेट अ‍ॅक्टिंगच असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे बरेच न्यू कमर अ‍ॅक्टर्स असा विचार करतात की, बॉडी आणि लुक्स अगोदरपासूनच तयार करून घेतले तर अ‍ॅक्टिंगमध्येही यश नक्कीच मिळेल, मात्र असे होत नाही. आज आपण अशाच काही अभिनेत्यांबाबत जाणून घेऊया, ज्यांचा स्मार्ट लूक असूनही ते बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरले.डिनो मोरिया१९९९ मध्ये ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या डिनो मोरियाने ‘राज’, ‘गुनाह’, ‘ओम शांती ओम’, ‘हॅपी न्यू इअर’ आदी चित्रपटात काम केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या स्मार्ट लूकमुळे रॅँपवर त्याची वेगळीच ओळख आहे. मात्र चित्रपटात त्याला फारसे यश मिळू शकले नाही.जायेद खान‘मैं हूॅँ ना..’ चित्रपटातील जायद खानचा लूक पाहून बऱ्याच तरुणी घायाळ होऊन त्याच्या फॅनही झाल्या होत्या. मात्र त्याची अ‍ॅक्टिंग पाहून त्यांनी जायेदकडे एकप्रकारे पाठच फिरविली. जायेदने बॉलिवूडमध्ये ‘मैं हूॅँ ना’ बरोबरच ‘वादा’, ‘शब्द’, ‘ओम शांती ओम’ ‘ब्ल्यू’, ‘तेज’ आदी चित्रपटांत काम केले आहे, मात्र त्याचा अभिनयामध्ये दम दिसून आला नाही आणि फ्लॉप ठरला.फरदीन खानफरदीन खानचे लूक्स देखील जबरदस्त होते, मात्र, त्याची अ‍ॅक्टिंग कमाल दाखवू शकली नाही. त्याने बॉलिवूडमध्ये ‘प्रेम अगन’, ‘जंगल’, ‘भूत’, ‘जानशिन’, ‘नो एन्ट्री’, ‘खुशी’, ‘दुल्हा मिल गया’ आदी चित्रपटांत काम केले आहे, मात्र कमकुवत अभिनयामुळे फरदीनला चित्रपटात फारसे यश मिळाले नाही.इमरान खानइमरान खानच्या लूक्सने तर धमालच के ली होती, मात्र, त्याच्या अ‍ॅक्टिंगने दर्शकांना खूपच नाराज केले. इमरानने ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटातून चाइल्ड अ‍ॅक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या व्यतिरिक्त ‘लक’, ‘डेल्ही बेल्ली’, ‘कट्टी बट्टी’ आदी अनेक चित्रपटांत काम केले आहे, मात्र स्मार्ट लुक असूनही कमकुवत अभिनयामुळे फ्लॉप ठरला.सोहेल खान२००२ मध्ये ‘मैनें दिल तुझको दिया’ चित्रपटापासून अभिनय करिअरला सुरुवात करणारा सलमान खानचा भाऊ सोहेल खानने ‘डरना मना है’, ‘लकीर’, ‘मैनें प्यार क्युं किया’, ‘फाइट क्लब’, ‘वीर’ तसेच ‘ट्युबलाइट’ आदी चित्रपटांत काम केले आहे. विशेष म्हणजे सोहेलची बॉडी सलमानपेक्षाही उत्कृष्ट आहे. मात्र, आतापर्यंत तो एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही. त्याचे सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

टॅग्स :बॉलिवूडडिनो मोरियाफरदीन खानइम्रान खानसोहेल खान