Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘साहो’मध्ये असा असेल ‘बाहुबली’ प्रभासचा लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 20:34 IST

​भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरलेल्या ‘बाहुबली-२’मध्ये बाहुबलीची मुख्य भूमिका साकारणाºया प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरलेल्या ‘बाहुबली-२’मध्ये बाहुबलीची मुख्य भूमिका साकारणाºया प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. चित्रपटातील प्रभासचा लुक समोर आला असून, तो यामध्ये धमाकेदार अ‍ॅक्शन अंदाजात दिसेल असेच काहीसे त्याच्या लुकवरून दिसून येत आहे. प्रभास नुकताच अमेरिकेहून सुट्या एन्जॉय करून भारतात परतला असून, लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात त्याच्यासोबत ‘बाहुबली’मधील देवसेना अनुष्का शेट्टी दिसणार आहे. ‘बाहुबली-२’मुळे प्रभास रातोरात सुपरस्टार झाला आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. कमाईच्या बाबतीत तर उच्चांक गाठला असून, चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक करणे हे सर्वांसमोरच आव्हान आहे. मात्र प्रभास हे स्टारडम एवढ्या सहजासहजी मिळाले नाही. याकरिता त्याला त्याच्या आयुष्यातील पाच वर्ष द्यावे लागले. प्रचंड मेहनत करून त्याने हे यश मिळवले आहे. आता प्रभास त्याच्या आगामी चित्रपटात कसा दिसेल, याविषयी सर्वांच्याच मनात कुतूहल निर्माण झाले होते. आता त्याचा लुक समोर आला असून, यामध्ये प्रभास अतिशय डॅशिंंग अंदाजात दिसत आहे.  ‘साहो’च्या शूटिंगविषयी सांगायचे झाल्यास, या चित्रपटाचे टिजर ‘बाहुबली-२’च्या रिलीजवेळीच समोर आले होते. टीजरमधील प्रभासचा अंदाज खूपच प्रभावित असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रभास लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असून, त्याकरिता त्याने त्याचा लुकही चेंज केला आहे. या लुकमधील त्याचा एक फोटो समोर आला असून, तो सेलिब्रिटी हेअर स्टायलिश आलिम हकीम यांच्याबरोबर दिसत आहे. आलिमनेच हा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केल्याने प्रभासच्या चाहत्यांना त्याचा हा नवा अंदाज बघावयास मिळत आहे. प्रभासचा हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.बाहुबलीच्या यशानंतर प्रभास काही दिवसांसाठी अमेरिकेला सुट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. मात्र तो कुठे होता, याचा त्याने कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. दरम्यान, या सुट्यांच्या काळातच त्याने काही चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स वाचल्या असल्याचे समजते. त्यातील काही स्क्रिप्टवर तो विचारही करत आहे. यामध्ये एका हिंदी चित्रपटाचाही समावेश आहे. मात्र याविषयीची अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा केली नसल्याने त्याबाबतचे सिक्रेट अजूनही कायम आहे.