Join us  

मांजरेकरांची लेक ठरतीये लोकप्रिय; सईने कोरलं Lokmat Most stylish Emerging Gen z performer पुरस्कारावर नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:54 PM

Saiee M Manjrekar: सध्या सगळीकडे 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांच्या लेकींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एक लेक मराठी कलाविश्वात तिचं स्थान निर्माण करत आहे. तर, दुसरी बॉलिवूडमध्ये. सई मांजरेकर हे नाव मराठीसह बॉलिवूडलाही नवीन राहिलं नाही. सईने सलमान खानच्या 'दबंग 3' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आणि पहिल्याच सिनेमातून लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे नवोदित अभिनेत्री असूनही तिने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच तिला Lokmat Most stylish Emerging Gen z performer या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

सध्या सगळीकडे 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत सोनू सूद, सुनील शेट्टी, संयमी खेर, अमृता खानविलकर अशा कितीतरी दिग्गज कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्येच सई मांजरेकर हिलाही लोकमत मोस्ट स्टायलिश जेन झेड स्टार अवॉर्ड पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee M Manjrekar) हिने दबंग ३ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने सलमान खान सोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमानंतर ती आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्यात दिसली होती. या गाण्यातील आयुष आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली होती. याशिवाय ती मेजर  आणि घानी या दोन सिनेमात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस 2023सई मांजरेकरमहेश मांजरेकर