Join us
Daily Top 2Weekly Top 5

Lalita Lajmi : ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचं निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 08:53 IST

ललिता लाजमी यांनी आमिर खानच्या 'तारे जमीन पर' या सिनेमात छोटी भूमिका साकारली होती.

दिवंगत अभिनेते गुरुदत्त यांच्या बहिण ललिता लाजमी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले.त्यांना कलेची आवड होती. त्यांचे आर्टवर्क प्रसिद्ध होते. ललिता लाजमी यांनी आमिर खानच्या 'तारे जमीन पर' या सिनेमात छोटी भूमिका साकारली होती. त्या शास्त्रीय नृत्यातही पारंगत होत्या.

जहांगीर निकोल्सन आर्ट फाउंडेशनने सोशल मीडियावर वृत्त देताना लिहिले, 'कलाकार ललिता लाजमी यांच्या निधनाने तीव्र दु:ख होत आहे. एक संवेदनशील  कलाकार आणि शास्त्रीय नृत्याची आवड असणाऱ्या ललिता लाजमी सुंदर कलाकार होत्या. 'डान्स ऑफ लाईफ अॅंड डेथ'या त्यांच्या आर्टवर्कमध्ये याचा अनुभव आला.

ॉललिता लाजमी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं जात आहे. विशेषत: कला क्षेत्रातील त्यांचे चाहते आणि कलेची समज, आवड असणारे ज्यांनी ललिता लाजमी यांचे काम जवळून पाहिले आहे त्यांच्या निधनाने अतिशय भावूक झाले आहेत. 'मी त्यांच्या आर्ट प्रदर्शनाला ३ दिवसांपूर्वीच गेलो होतो. फार दु:ख होत आहे.' अशी कमेंट एकाने केली आहे.

टॅग्स :मृत्यूगुरू दत्तकला