Join us  

Laal Singh Chaddha Twitter Review:  ‘बायकॉट’ नव्हे ‘ब्लॉकबस्टर’! आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर नेटकरी खुश्श!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:16 AM

Laal Singh Chaddha Twitter Review: रिलीजआधी सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार घालण्याची मागणी झाली. अगदी #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड झाला. पण रिलीजनंतर चित्र एकदम बदललं आहे...

Laal Singh Chaddha Twitter Review:  आमिर खानचालाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा आज चित्रपटगृहांत रिलीज झाला. आता  फर्स्ट डे, फर्स्ट शो बघितलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. आमिर व करिनाचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा प्रेक्षकांना भलताच आवडला आहे. ट्विटरवर नेटकरी या चित्रपटाचं कौतुक करताना थकत नाहीयेत.

रिलीजआधी सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार घालण्याची मागणी झाली. अगदी #BoycottLaalSinghChaddh ट्रेंड झाला. पण रिलीजनंतर चित्र एकदम बदललं आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर #GlobalLoveForLaalSingh व #BetterThanTheOriginal ट्रेंड होत आहे. ट्विटरवर अनेकांनी या चित्रपटाचं मनापासून कौतुक केलं आहे. 

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा ‘फारेस्ट गम्प’ या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहेत. टिष्ट्वटरवरचे युजर्स ‘लाल सिंग चड्ढा’ हा ओरिजनल सिनेमापेक्षाही चांगला असल्याचं म्हणत आहेत. आमिर, करिना, मोना सिंग, नागा चैतन्य यांच्या अभिनयाचंही कौतुक होतंय. चित्रपटाची कथाही लोकांना आवडली आहे. अगदी प्रत्येक सिनेप्रेमीने हा सिनेमा बघायला हवा, असं ट्विटर युजर्स म्हणत आहेत. लोकांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हटलं आहे.बेटर दॅन द ओरिजनल, ब्लॉकबस्टर, अशी कमेंट चित्रपट पाहिल्यानंतर एका युजरने दिली आहे.

हा आमिरचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा आहे. त्याने आत्तापर्यंत कधीही इतकी उत्तम अ‍ॅक्टिंग केली नाही, असं एका युजरने म्हटलं आहे.

आमिरच्या सिनेमात शाहरूखचा कॅमिओ रोल आहे. सोशल मीडियावर तो सीनही व्हायरल होतोय. शाहरूख स्क्रिनवर येताच लोक टाळ्या वाजवत आहेत.

बायकॉट ट्रेंड फॉलो न करता हा चित्रपट नक्की पाहा, असं आवाहनही अनेक नेटकऱ्यांनी केलं आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आमिर खान व करिना कपूर लीड रोलमध्ये आहेत. मोना सिंग हिने आमिरच्या आईची भूमिका साकारली आहे. साऊथ स्टार नागा चैतन्य या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 

टॅग्स :लाल सिंग चड्ढाआमिर खानकरिना कपूरमोना सिंगट्विटर