Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिती सनॉनलाही अलिबागची भुरळ, समुद्रकिनारी खरेदी केला मोठा प्लॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 15:42 IST

विराट कोहली, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री क्रिती सनॉनदेखील अलिबागकर होण्याच्या मार्गावर आहे. क्रितीनेदेखील अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 

अलिबाग हे बॉलिवूड सेलिब्रिटींचं आवडतं ठिकाण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अलिबागचे समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण आणि हिरवळीने बॉलिवूडकरांना भुरळ घातली आहे.  अनेक सेलिब्रिटींनी अलिबागमध्ये बंगले विकत घेतले आहेत. विराट कोहली, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री क्रिती सनॉनदेखील अलिबागकर होण्याच्या मार्गावर आहे. क्रितीनेदेखील अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, क्रितीने अलिबागमध्ये २००० स्क्वे.फूट परिसरात पसरलेला प्लॉट खरेदी केला आहेय. मुंबईजवळ असलेल्या अलिबागमध्ये क्रितीने 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या रिअल इस्टेट कंपनीद्वारे हा प्लॉट घेतला आहे. अलिबागमध्ये क्रितीने खरेदी केलेला हा प्लॉट प्राइम लोकेशनवर आहे. क्रितीने सी फेसिंग प्लॉट खरेदी केला आहे. याबाबत क्रिती म्हणाली, "आता मी एक आनंदी मालक आहे आणि याचा मला गर्व आहे. प्लॉट खरेदी करण्याचा हा प्रवास सक्षमीकरणाचा होता. आणि अलिबागमध्ये प्लॉट घेण्याचा माझा विचार होता. मला कशाप्रकारची जागा हवी आहे, हे मला माहीत होतं. शांत, सुंदर आणि प्रायव्हसी असलेली जागा मला हवी होती". "माझ्या वडिलांनादेखील ही जागा खूप आवडली. हे प्राइम लोकेशन आहे. आणि मांडवा जेट्टीपासून अगदी २० मिनिटांच्या अंतरावर आहे. अलिबागमध्ये जागा खरेदी करण्याची यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही", असंही तिने पुढे म्हटलं आहे. 

क्रिती सनॉन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. क्रितीने हिंदीबरोबरच तेलुगु सिनेमांतही काम केलं आहे. 'हिरोपंती', 'आदिपुरुष', 'क्रू', 'गणपत', 'भेडिया', 'लुका छुपी', 'शहजादा' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये ती दिसली. मिमी हा क्रितीचा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' या सिनेमात क्रिती दिसली होती. या सिनेमात तिने शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. 

टॅग्स :क्रिती सनॉनअलिबागसेलिब्रिटी