Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' अभिनेत्रीने स्वत:लाच गिफ्ट केली १ कोटीची कार, बॉयफ्रेंडसोबत मारला फेरफटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 11:57 IST

बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य खूपच लक्झरिअस असतं.

बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य खूपच लक्झरिअस असतं. महागड्या गाड्या, मोठं घर अशा थाटात ते जगतात. अभिनेत्री क्रिती खरबंदाने (Kriti Kharbanda) नुकतीच एक महागडी कार खरेदी केली. लैंड रोवर रेंज रोवर वेलार 2.0 आर डायनॅमिक एस डीजल या कारची किंमत जवळपास 90 लाख  ते १ कोटी रुपये आहे. क्रितीने बॉयफ्रेंड पुलकित सम्राटसोबत (Pulkit Samrat) या महागड्या कारमधून लॉंग ड्राईव्हचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे ही कार तिने स्वत:लाच गिफ्ट केली आहे.

जय पवनपुत्र हनुमान! नव्या पोस्टरमध्ये देवदत्त नागेने वेधलं लक्ष; 'आदिपुरुष' सिनेमाची उत्सुकता

'शादी मे जरुर आना' फेम अभिनेत्री कृती खरबंदाने लाल रंगाची रेंज रोवर वेलार खरेदी करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. लॉंग टर्म बॉयफ्रेंड पुलकित सम्राटसोबत तिने ड्रायव्हिंगचा आनंद लुटला. दोघंही खूपच आनंदात दिसत होते. हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप आणि कार्गो पँट अशा कॅज्युअल लुकमध्ये क्रिती दिसली. तर पुलकित निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचा टीशर्टमध्ये कूल दिसत होता. इन्स्टंट बॉलिवूडने व्हिडिओ पोस्ट केला आहे.

लैंड रोवर रेंज रोवर वेलार 2.0 आर डायनॅमिक एस डीजल 180 रेंज रोवर वेलार लाइन अपमध्ये डीजल वर्जन आहे. 72 लाखांपासून याची सुरुवात होते. ही कार 15.2 kmpl मायलेज देते. अभिनेत्री क्रिती खरबंदाने पहिल्यांदाच महागडी कार खरेदी केलेली नाही. याआधीही तिने 2017 मध्ये आई वडिलांना कार गिफ्ट केली होती.

क्रिती आणि पुलकित गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. 'वीरे की वेडिंग' आणि 'पागलपंती' या सिनेमात त्यांनी एकत्र काम केले आहे. दोघं लग्न कधी करणार याकडे आता त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय.

टॅग्स :कृति खरबंदाबॉलिवूडकार