सध्या बॉक्स ऑफिसवर रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमासोबतच आणखी एका सिनेमाची गाडी जोरदार सुरू आहे. कृष्णभक्तीवर आधारित असलेल्या 'कृष्णावतारम पार्ट १' या सिनेमाची चर्चा आहे. ७ मे रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट आहे. कोणताही मोठा हिरो किंवा अभिनेत्री नसूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे.
'कृष्णावतारम' सिनेमाने अवघ्या ४ दिवसांत १० कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त ४२ लाखांचा बिजनेस केला होता. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने १.१५ कोटी कमावले. वीकेंडचा सिनेमाला खूप चांगला फायदा मिळाला. शनिवारी-रविवारी 'कृष्णावतारम' सिनेमाने ५.७५ कोटींची कमाई केली. तर सोमवारी या चित्रपटाने १.३५ कोटींचा गल्ला जमवला.
'कृष्णावतारम' सिनेमाची कथा भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारित आहे. सत्यभामा यांच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारी सिनेमाची कथा आहे. जी याआधी कधीच मोठ्या पडद्यावर दाखवली गेली नाही. राधा, रुक्मिणी आणि कृष्ण यांच्यातील प्रेम, भक्ती, त्याग आणि नात्यांतील भावनिक संघर्ष या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. हा एक पौराणिक सिनेमा असून त्याचं दिग्दर्शन हार्दिक गुज्जर यांनी केलं आहे. अभिनेता सिद्धार्थ गुप्ताने सिनेमात श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री संस्कृती जयना सत्यभामा तर सुष्मिता भट राधाच्या भूमिकेत आहे.
Web Summary : Despite lacking star power, 'Krishnavataram Part 1,' a film based on Krishna devotion, is performing strongly at the box office. The film has earned ₹10 crore in just four days. The movie revolves around Lord Krishna's life, exploring love, devotion, and sacrifice.
Web Summary : बड़े सितारों के बिना भी, कृष्ण भक्ति पर आधारित फिल्म 'कृष्णावतारम पार्ट 1' बॉक्स ऑफिस पर जोरदार प्रदर्शन कर रही है। फिल्म ने सिर्फ चार दिनों में ₹10 करोड़ कमाए। यह फिल्म भगवान कृष्ण के जीवन, प्रेम, भक्ति और त्याग को दर्शाती है।