स्वत:वर जोक करण्याची कला शिका शाहरूखकडून -अनुष्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 16:18 IST
बॉलिवूडची ‘पंजाबी कुडी’ अनुष्का शर्मा हिला इंडस्ट्रीत येऊन आता आठ वर्षे झाली. यादरम्यान तिला बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत चित्रपटात ...
स्वत:वर जोक करण्याची कला शिका शाहरूखकडून -अनुष्का
बॉलिवूडची ‘पंजाबी कुडी’ अनुष्का शर्मा हिला इंडस्ट्रीत येऊन आता आठ वर्षे झाली. यादरम्यान तिला बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत चित्रपटात काम करण्याची तीनदा संधी मिळाली. आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला अन शाहरूखसोबत तिचे मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी ‘जब तक हैं जान’ यात एकत्र काम केले. आता लवकरच ते इम्तियाज अलींच्या ‘द रिंग’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसतील.अनुष्का शाहरूखसोबतच्या मैत्रीवर फिदा होऊन त्याच्यामधील एक उत्तम कला सांगताना म्हणते,‘शाहरूख हा एक कलाकार म्हणून तर तो उत्तम आहेच पण तो एक व्यक्ती आणि मित्र म्हणून फार चांगला आहे. त्याच्यासोबत असल्यावर तुम्ही सर्व दु:ख, अडचणी विसरून जाऊ शकता. सेटवर तो जोकसाठी कुणालाही आपला निशाणा बनवतो. कधीकधी समोरच्या व्यक्तीला हसवण्यासाठी तो स्वत:वरच जोक करतो. ही कला केवळ त्याच्याकडेच आहे. मी त्याच्यासोबत असल्यावर प्रचंड हसते.’ ‘ए दिल हैं मुश्किल’ अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि शाहरूख खान हे ‘द रिंग’ चित्रपटासाठी सध्या शूटिंग करत असून त्यांच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील हा तिसरा एकत्र चित्रपट आहे. ती शाहरूखचे कौतुक करताना थकत नाही. ती म्हणते,‘मी जेव्हा शाहरूख सोबत काम क रते तेव्हा तो माझ्याशी खुप गप्पा मारतो. तो मला त्याच्या आयुष्याविषयी सांगतो. त्याचे अनुभव, तत्त्वज्ञान, गमतीदार किस्से शेअर करत असतो. इम्तियाजलाही तत्त्वज्ञान प्रचंड आवडते. म्हणून आम्ही तिघे एकत्र बसून आयुष्य आणि वळण यावर गप्पा मारतो.’