Join us
Daily Top 2Weekly Top 5

किकी चॅलेंजची सुरुवात केली होती किशोर कुमार आणि बंधूनी, हा घ्या पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 06:00 IST

किकी चॅलेंजची खरी सुरुवात किशोर कुमार, अशोक कुमार आणि अनुप कुमार यांनी केली होती असा आशयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅनडातील सिंगर रॅपर ड्रेक ने 'In My Feelings' नावाचं गाणं शेअर केलं होतं. या गाण्याची पहिली लाईन, किकी, तू माझ्यावर प्रेम करतेस का?, तू रस्त्यात आहेस का? अशी आहे. यानंतर जो व्हायरल ट्रेंन्ड सुरू झाला. त्यामुळे गाणे मागे पडले असून लोकं किकी डान्सच करू लागले आहेत. सर्वात आधी शिग्गी नावाच्या एका कॉमेडियनने आपल्या 16 लाख फॉलोअर्ससोबत किकी डान्स व्हिडीओ #KikiChallenge असा हॅश टॅग वापरून शेअर केला होता. तेव्हापासून किकी चॅलेंजचे लोण जणभर पसरले आहे. 

ड्रेकच्या ‘स्कॉर्पियन’ अल्बममधील या गाण्यावरचा पदन्यास करताना तो चालत्या गाडीतून बाहेर येऊन करायचा आणि नाचल्यावर पुन्हा गाडीत जाऊन बसायचं असा अत्यंत धोकादायक  प्रकार ‘किकी चॅलेंज’ म्हणून समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. किकी चॅलेंजचं हे खूळ स्पेन, यूएस, मलेशिया आणि यूएईसारख्या देशांतही पसरलं आहे. विशेष म्हणजे ड्रेकच्या मूळ गाण्यात कुठेही असा स्टंट नाही. चालत्या गाडीतून बाहेर येऊन डान्स करून पुन्हा गाडीत बसेपर्यंत गाडीचा वेग १० किमी प्रति तास ठेवला जातो. हे चॅलेंज काही दिवसांपूर्वीच सुरू झालेले आहे. पण किकी चॅलेंजची खरी सुरुवात किशोर कुमार, अशोक कुमार आणि अनुप कुमार यांनी केली होती असा आशयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चलती का नाम या चित्रपटात किशोर कुमार, अशोक कुमार, अनुप कुमार आणि मधुबाला यांच्या मुख्य भूमिका आहेत. चलती का नाम गाडी या चित्रपटाचे टायटल साँग बाबू समझो इशारे रसिकांना प्रचंड आवडते. या गाण्यातील काही दृश्यात किशोर कुमार, अनुप कुमार आणि अशोक कुमार चालत्या गाडीतून बाहेर येऊन नाचतात आणि पुन्हा एकदा गाडीत जाऊन बसतात असे आपल्याला पाहायला मिळाले होते. याच गाण्यातील दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून किशोर कुमार आणि त्यांच्या बंधूंनी सर्वप्रथम किकी चॅलेंजला सुरुवात केली असे नेटिझन्सचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :किकी चॅलेंजअशोक कुमारकिशोर कुमार