Join us

किच्चा सुदीपच्या 'Kabzaa'चा जबरदस्त ट्रेलर, पाहून चाहत्यांना झाली 'KGF'ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 10:17 IST

Kabzaa Trailer: सिनेमाचं कथानक गॅंगस्टर्सवर आधारित आहे. २.५४ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्स आहेत.

बहुप्रतिक्षीत कब्जा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालीये. कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप व आर. चंद्रूच्या या सिनेमाचा ट्रेलर महानायक अमिताभ बच्चन यांनी रिलीज केला. जबरदस्त ॲक्शन आणि सस्पेन्सनी भरलेला हा ट्रेलर बघून तुम्हाला केजीएफची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तूर्तास 'कब्जा' ट्विटरवर ट्रेंड करतोय. लीड रोलमध्ये किच्चा आहे आणि किच्चाचा अंदाज पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

सिनेमाचं कथानक गॅंगस्टर्सवर आधारित आहे. २.५४ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्स आहेत. 'कब्जा'चा ट्रेलर पाहून अनेकांनी या सिनेमाची केजीएफसोबत तुलना केली आहे. जणू मी केजीएफ ३ बघतोय, असं एका युजरने ट्रेलर पाहिल्यानंतर लिहिलं. एका युजरने अंगावर शहारा आणणारा ट्रेलर, अशा शब्दांत 'कब्जा'च्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

हा सिनेमा येत्या १७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याचदिवशी कॉमेडियन कपिल शर्मा व नंदिता दासचा 'ज्विगाटो'ही रिलीज होतोय. अशात 'कब्जा' व 'ज्विगाटो' यापैकी बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारतो, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.

पाच भाषेत हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यात हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ, तेलुगू या भाषांचा समावेश आहे. किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता त्याच्या 'कब्जा'वर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 'पठाण' या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिस सुस्तावला आहे. अक्षय कुमारचा सेल्फ व कार्तिक आर्यनचा शहजादा दणकून आपटल्यानंतर मेकर्स नवा सिनेमा रिलीज करताना काहीसे घाबरले आहेत. अशात किच्चा सुदीपच्या 'कब्जा'कडून मेकर्सला मोठ्या अपेक्षा आहेत.  

टॅग्स :Tollywoodसिनेमा