Join us  

VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल...

By अमित इंगोले | Published: November 03, 2020 11:02 AM

अक्षय कुमारसोबत कियारा लक्ष्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकेच दोघेही कपिल शर्मा शोमध्ये गेले होते.

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या कथित अफेअरची नेहमीच चर्चा होत असते. कारण दोघांनी अनेकदा एकत्र बघण्यात आलंय. पण दोघांनी कधीही डेटिंगच्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, कपिल शर्मा शोमध्ये अक्षय कुमारने कियाराची पोलखोल केली आहे.

अक्षय कुमारसोबत कियारा लक्ष्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकेच दोघेही कपिल शर्मा शोमध्ये गेले होते. यावेळी अक्षय कुमारने तिची पोलखोल केली. अक्षय कुमारने कियाराच्या लव्ह लाइफवरून पडदा उठवत ती 'सिद्धांत' असलेली मुलगी आहे. (नवीन टायटलसह प्रदर्शित झाले ‘लक्ष्मी’ सिनेमाचे नवीन पोस्टर, कियाराच्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं)

कपिल शर्मा शोची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात कपिल शर्मा कियाराला लव्ह लाइफबाबत प्रश्न विचारतो. ज्यावर कियारा सांगते की, मी आता माझ्या पर्सनल लाइफबाबत काही बोलणार नाही. तेव्हाच बोलणार जेव्हा माझं लग्न होईल.

कियाराचं हे उत्तर ऐकून सगळेच गप्प झाले. यावर कपिल म्हणाला की, चला त्या व्यक्तीसाठी टाळ्या वाजवू ज्याच्यासोबत कियारा लग्न करणार आहे. सध्या तर आम्ही तुला शुभेच्छा देऊ शकतो. यावर अक्षय कुमार म्हणाला की, ही फार 'सिद्धांत' असलेली मुलगी आहे. अक्षयच्या या उत्तरावर सगळेच हसू लागतात. (सिद्धार्थ मल्होत्राला डेट करतेय कियारा अडवाणी ?, अभिनेत्री म्हणाली- मी अजूनही सिंगल)

अक्षयचं उत्तर ऐकताच कियारा ब्लश करू लागते. आता कियाराला लाजताना पाहून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की, यावेळी तिने कुणाचा विचार केला असेल. दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थ 'शेरशाह' सिनेमात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. हा सिनेमा कारगिल हिरो कॅप्टन विक्रम बत्राचा बायोपिक आहे. सिद्धार्थ यात विक्रम आणि त्याचा जुळा भाऊ विशालची भूमिका साकारताना दिसेल.

सिद्धार्थ आणि अक्षय कुमारनने 'ब्रदर्स' सिनेमात एकत्र काम केलं आहे. या बॉक्सिंग सिनेमात सिद्धार्थ, अक्षय कुमारचा लहान भाऊ होता. तसेच अक्षयसोबत कियाराने गुड न्यूजमध्ये काम केलं. हा सिनेमा २०१९ मध्ये रिलीज झाला होता.  

टॅग्स :कियारा अडवाणीअक्षय कुमारबॉलिवूडकपिल शर्मा