Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पहिल्यापासूनच तुम्ही मला...", सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचं निधन, सासऱ्यांच्या आठवणीत कियाराची डोळे पाणवणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:21 IST

सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. १४ फेब्रुवारीला सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.सासऱ्यांच्या निधनानंतर अभिनेत्री आणि सिद्धार्थची पत्नी कियारा अडवाणी हिनेदेखील भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. १४ फेब्रुवारीला सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतच कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिद्धार्थने ही दु:खद बातमी दिली. सासऱ्यांच्या निधनानंतर अभिनेत्री आणि सिद्धार्थची पत्नी कियारा अडवाणी हिनेदेखील भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

कियाराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सासऱ्यांसोबतची एक आठवण शेअर केली आहे. फोटो शेअर करत ती म्हणते, "पहिल्यापासूनच तुम्ही खूप मोकळ्या मनाने माझं स्वागत केलं. तुमचं निस्वार्थ प्रेम हा आम्हा सर्वांचा आधार होता. तुमच्या प्रेमाची उब कधीच कमी झाली नाही. तुमच्या दानशूरपणा होता. तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी तुमच्या कुटुंबाबद्दलचं प्रेम होतं. ते तुम्ही प्रत्येकवेळेस दाखवून दिलं. तुम्ही काळजीपूर्वक समोरच्याचं म्हणणं ऐकायचात. प्रत्येक छोटी गोष्ट तुमच्या लक्षात असायची. तुम्ही सढळ हाताने मदत करायाचात आणि कधीच त्याबद्दल कोणतीही अपेक्षा ठेवली नाही". 

पुढे कियारा म्हणते, "तुमच्या कथा, तुमचं हास्य, तुमची ताकद आणि तुमचं निर्मळ हृदय हे कायमच माझ्यासोबत राहील. तुम्हा नम्रपणा, प्रामाणिकपणा आणि अखंड प्रेमाचा वारसा सोडून गेला आहात. ते तुमच्या मुलांमध्ये, नातवंडांमध्ये आणि तुम्हाला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कायम राहील. आता आराम करा. तुमची आठवण कायम राहील. तुमच्यावरचं प्रेम आणि सदैव स्मरणात राहाल". 

English
हिंदी सारांश
Web Title : Sidharth Malhotra's Father Passes Away; Kiara's Emotional Tribute

Web Summary : Sidharth Malhotra's father, Sunil, passed away in Delhi. Kiara Advani shared a heartfelt tribute to her father-in-law, remembering his kindness, generosity, and unwavering love for his family. She highlighted his humility, honesty, and the legacy of love he leaves behind.
टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी