Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानला कोरोनाची लागण होताच या अभिनेत्रीला बसली धास्ती, करणार टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 17:55 IST

या अभिनेत्रीने एका जाहिरातीसाठी नुकतेच आमिरसोबत चित्रीकरण केले आहे.

ठळक मुद्देआमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने घरीच स्वतःला क्वारंटाइन केले आहे.  

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यात कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील बरेच कलाकार अडकले आहेत.

आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने घरीच स्वतःला क्वारंटाइन केले आहे.  आमिरला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कियारा अडवाणी आणि दंगल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी टेन्शनमध्ये आले आहेत. कारण त्या दोघांनी नुकतेच आमिरसोबत एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले आहे. आता या जाहिरातीच्या सेटवर असलेल्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञान मंडळींची कोरोनाची टेस्ट केली जाणार आहे.

आमिर खानने त्याच्या स्टाफलादेखील कोरोनाची टेस्ट करायला सांगितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आमिर खानने त्याच्या स्टाफला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय सर्व नियम आणि काळजी घेण्यासही सांगितले आहे. आमिर खान काही दिवसांपूर्वी लाल सिंग चड्ढाचे शूटिंग करत होता. पण त्याने या चित्रीकरणातून ब्रेक घेतला होता. तब्येत सुधारल्यानंतर या चित्रपटाचे पुन्हा चित्रीकरण करण्याचे त्याने ठरवले आहे. 

टॅग्स :आमिर खानकियारा अडवाणीकोरोना वायरस बातम्या