Join us

कियारा अडवाणीचा डान्स होतोय तूफान व्हायरल, ही आहे डान्सची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 16:07 IST

नेटकऱ्यांना कियाराचा डान्स भन्नाट आवडला आहे.

बॉलिवूड कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. फॅन्सना कियाराचा हा व्हिडीओ भलताच पसंत पडला आहे.   या व्हिडीओत कियारा लग्न डान्स करताना दिसतेय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये कियारा सोबत तिचे वडीलदेखील या  डान्स करताना दिसतायेत. बाप-लेकीच्या जोडीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे.  

कियारा आपल्या मित्राच्या लग्नात वडिलांसोबत गेली होती. तिथे रणबीर कपूरचे गाणं क्युटीपाईवर दोघांनी धमाकेदार डान्स केला. व्हिडीओतील बाप-लेकीची केमिस्ट्री सगळ्यांना चांगलीच भावली आहे.  हा व्हिडीओ आताचा नाही तो जुना आहे.  कियाराच्या फॅनपेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.  

डब्बू रत्नानीसाठी केलेल्या फोटोशूटमुळे कियारा चर्चेत आली होती. कियाराने टॉपलेस फोटोशूट केले होते. ज्यानंतर ती ट्रोलर्सचा शिकार झाली होती. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कियारा 2019मध्ये आलेल्या 'कबीर सिंह'मध्ये दिसली होती.यानंतर अक्षय कुमार, करिना कपूर स्टारर गुड न्यूमध्ये ही ती होती. लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत भूल भुलैया 2 मध्ये दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.   

टॅग्स :कियारा अडवाणी