Join us  

K.G.F: Chapter 2 : 'माझी बदनामी करू नको', असं संजय दत्त का म्हणाला यशला; जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 1:33 PM

साउथचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'केजीएफ-२' (K.G.F: Chapter 2) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी संजय दत्त (Sanjay Dutt)ने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे बरेच किस्से सांगितले.

साउथचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'केजीएफ-२' (K.G.F: Chapter 2) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. यश(Yash), संजय दत्त (Sanjay Dutt) , रवीना टंडन (Raveena Tandon) आणि चित्रपटाचा निर्माता करण जोहर (Karan Johar) यांनी केजीएफच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. ट्रेलर लाँचमध्ये संजय दत्तने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे बरेच किस्से सांगितले. 

यश म्हणजेच केजीएफच्या रॉकी भाईने संजय दत्तची प्रशंसा केली. तो म्हणाला की, 'तब्येत खराब असताना देखील संजय दत्त यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. यामधून त्यांचे कामाप्रती निष्ठा दिसते. बऱ्याच जणांना माहित आहे की, कशाप्रकारे त्यांनी अॅक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण केले. मी अॅक्शन सीनमुळे खूप घाबरलो होतो. मी सर्वांना सावध राहायला सांगितले होते. तेव्हा संजय दत्त माझ्या जवळ आले आणि म्हणाले की, यश, कृपया माझी बदनामी करू नको. मी हे शूटिंग करणार आहे आणि मला हे करायचे आहे. मी बेस्ट काम करेन.'

'केजीएफ-२'च्या शूटिंग दरम्यान संजय दत्त करत होता कॅन्सरचा सामनापुढे यशने सांगितले की, 'संजय सर हे एक योद्धा आहेत.' 'केजीएफ-२' च्या शूटिंग दरम्यान संजय दत्त कॅन्सर या आजाराचा सामना करत होते. पण तरी देखील त्याने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.  केजीएफ चॅप्टर-१ चित्रपट २०१८ साली रिलीज झाला. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग भेटीला येतो आहे. हिंदी बरोबरच तेलगु, तमिळ आणि मल्याळम या भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

टॅग्स :संजय दत्तयशकेजीएफ