Join us  

कतरिना कैफचा झाडू मारतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल, देसी अंदाज पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 6:40 PM

Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सातत्याने चर्चेत येत असते. सध्या तिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सातत्याने चर्चेत येत असते. सध्या तिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती सेटवर झाडू मारताना दिसत आहे. खरेतर हा व्हिडीओ 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला अक्षय कुमार(Akshay Kumar)चा आवाजही ऐकू येत आहे. हा व्हिडीओ २०२० साली स्वतः अक्षय कुमार याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.

व्हायरल होत असलेल्या कतरिना कैफच्या व्हिडीओत ती पांढऱ्या रंगाच्या सलवार-कुर्त्यात दिसत आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार कतरिना कैफला तू काय करतेय? असा प्रश्न विचारतो. याचे उत्तर देताना कतरिना 'मी साफसफाई करतेय,' असे सांगताना दिसते. या व्हिडिओमध्ये अक्षयचा फक्त आवाज ऐकू येतो आहे. या व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, 'रिअल क्वीन'. दुसर्‍या युजरने म्हटले, 'धर्मापत्नी'.

कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची हॉरर कॉमेडी 'फोन भूत'मध्ये झळकली होती. तिच्यासोबत या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. आता ती लवकरच सलमान खानसोबत 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे. याशिवाय कतरिना श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत झळकणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफअक्षय कुमारसूर्यवंशी