कॅट व रणवीरचा आॅनस्क्रीन रोमान्स रंगणार असेल तर या बातमीवर दीपिका पादुकोणची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणेही या निमित्ताने इटरेस्टिंग ठरणार आहे. कारण कॅट व दीपिका या दोघींमधील कोल्डवॉर तुम्हाला ठाऊक आहेच. दोघी एकमेकींकडे पाहणेही पसंत करत नाही. अशास्थितीत आपल्या बॉयफ्रेन्डसोबत कॅटचा रोमान्स दीपिका पाहु शकेल?
ALSO READ : OMG! दीपिका पादुकोणवर भारी पडली निया शर्मा!!
रणवीरआधी दीपिका रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण रणबीरने कॅटरिनासाठी दीपिकाला सोडले होते. ( पुढे कॅटरिना व रणबीर यांचेही ब्रेकअप झाले. ) तेव्हापासून दीपिका व कॅट या दोघींमध्ये बिनसले. अलीकडे शाहरूखच्या वाढदिवसाच्या पार्टीत कॅट व दीपिका दोघीही एकमेकांना टाळताना दिसल्या होत्या. त्यापूर्वी फिल्मफेअर ग्लॅमर अॅण्ड स्टाईल अवार्डमध्येही दोघींमधील अंतर स्पष्ट दिसले होते. म्हणूनच रणवीरसोबत कॅटला पाहून दीपिका कशी रिअॅक्ट होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.