बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार रंगताना दिसते आहे. अद्याप या जोडीने त्यांच्या लग्नाबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही. मात्र मीडियामध्ये त्यांच्या लग्नाच्या तारखेपासून ठिकाणापर्यंतच्या बातम्या समोर आल्या आहेत. दरम्यान आता ते लग्नानंतर कुठे राहणार आहेत, हेदेखील समोर आले आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, त्यांना मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी विकी कौशल आणि कतरिना कैफ जुहू येथील एका हाई राइज बिल्डिंगमध्ये गेले होते, जिथे मागील वर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने घर विकत घेतले होते. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ बऱ्याचदा तिथे आले आहेत. आता असे सांगितले जात आहे की डील फायनल झाली आहे आणि लग्नानंतर ते दोघे याच अपार्टमेंटमध्ये राहणार आहेत.