Join us  

Video : काय सांगता? लग्नानंतर चारच महिन्यात कतरिना कैफ प्रेग्नंट? व्हिडीओवरून चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 6:12 PM

Katrina Kaif Video : होय, कतरिना नुकतीच एअरपोर्टवर दिसली. पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाला आणि पाठोपाठ कतरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) व अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकले. पण लग्न होऊन उणेपुरे चार महिने होत नाहीत तोच, कतरिनाकडे गुडन्यूज असल्याची चर्चा सुरु झालीये. या चर्चेला कारण ठरलाये तो कतरिनाचा एक ताजा व्हिडीओ.होय, कतरिना नुकतीच एअरपोर्टवर दिसली. पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाला आणि पाठोपाठ कतरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली.  

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत कतरिना गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसतेय. व्हिडीओत ज्या पद्धधतीने कतरिना आपलं पोट लपवण्याचा प्रयत्न करतेय, त्यावरून ती प्रेग्नंट असल्याच्या अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. ‘ती प्रेग्नेंट असल्यासारखी का दिसते?,’असं एका युजरने म्हटलं आहे. ‘मला वाटतेय, ही प्रेग्नंट आहे,’ अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.

नुकतेच विकी व कतरिना  हॉलिडेवरून परतले. 7 एप्रिलला कतरिनाने बीचवरचे सुंदर फोटो शेअर केले होते. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्यावर्षी 9 डिसेंबरला विकी व कतरिना लग्नबेडीत अडकले होते. राजस्थानात हा शाही विवाह सोहळा पार पडला होता. या लग्नात केवळ कुटुंबीय व जवळचे मित्रमंडळी सामील झाले होते.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कतरिना सध्या सलमानसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटात बिझी आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तामिळ व तेलगूत रिलीज होणार आहे. याशिवाय फोन भूत, जी ले जरा, मेरी ख्रिसमस या चित्रपटातही ती झळकणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूड