Join us

कॅटरिना कैफचा खुलासा, सलमान खानसाठी नाही तर 'या' व्यक्तीसाठी साईन केला 'भारत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 12:00 IST

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत'मध्ये प्रियांका चोप्राच्या जागी कॅटरिना कैफने घेतली आहे, यावर कॅटने नुकतेच आपले मौन सोडले आहे. एका अॅवॉर्ड सोहळ्यात मीडियाशी कॅटरिना कैफने संवाद साधला.

ठळक मुद्दे'भारत'चे सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे'भारत'चा फर्स्ट लूकसुद्धा आऊट झाला आहे

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत'मध्ये प्रियांका चोप्राच्या जागी कॅटरिना कैफने घेतली आहे, यावर कॅटने नुकतेच आपले मौन सोडले आहे. एका अॅवॉर्ड सोहळ्यात मीडियाशी कॅटरिना कैफने संवाद साधला. जर तुम्हाला वाटत असेल की मी हा सिनेमा माझ्या जवळचा मित्र सलमान खानसाठी साईन केला आहे तर तसे नाही. कॅटरिनाने बोलताना भारतचा दिग्दर्शक अली अब्बास जफरमुळे साईन केल्याचे सांगितले. 

कॅटरिना म्हणाली,  अली अब्बास जाफर माझा खूप चांगला मित्र आहे. याआधी आम्ही दोघांनी 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'टायगर जिंदा है'साठी एकत्र काम केले आहे, दोनही सिनेमा हिट गेले आहेत. मला अलीचा फोन आला तो म्हणाला मी तुला स्क्रिप्ट पाठवतोय जर तुला स्क्रिप्ट आवडली तर मला सांग. मला स्क्रिप्ट खूपच आवडली. मी या सिनेमाला घेऊन खूपच उत्साहित आहे. 

भारतचे सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. सिनेमाचा फर्स्ट लूकसुद्धा आऊट झाला आहे. यात सलमानच्या बहिणीची भूमिका दिशा पटानी साकारणार आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला प्रियांका व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.  या सिनेमात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते. 

टॅग्स :कतरिना कैफसलमान खान