Join us

कतरिना कैफने एका मुलाला लग्नासाठी केले प्रपोज आणि त्याने चक्क दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:54 IST

शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. या कार्यक्रमाचे आजवरचे ...

शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या सिझनमधील चिमुकले स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे कोणता स्पर्धक या कार्यक्रमात बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. सुपर डान्सर चॅप्टर 2 मध्ये नुकतीच सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी हजेरी लावली होती. ते या कार्यक्रमात आपला आगामी चित्रपट टायगर जिंदा है च्या प्रमोशनसाठी आले होते. या कार्यक्रमातील सगळ्या स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहून सलमान आणि कतरिना खूप खूश झाले होते. ते लहान मुलांच्या परफॉर्मन्सच्या प्रेमात पडले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आकाश मित्राच्या पांडेजी सिटी या गाण्यवरच्या नृत्यावर तर कतरिना कैफ फिदा झाली होती. कतरिनाला आकाशचे नृत्य आणि चिमुकला आकाश इतका आवडला की, त्याचा परफॉर्मन्स संपल्यानंतर कतरिना कैफने त्याला प्रपोज केले. कतरिनाने प्रपोज केल्यानंतर पाच वर्षांच्या चिमुकल्याने दिलेले उत्तर ऐकून उपस्थितांना त्यांचे हसू आवरत नव्हते. कतरिनाने प्रपोज केल्यानंतर आकाशने काही मिनिटे विचार केला आणि त्यानंतर त्याने तिला स्टेजवरच नकार दिला. हे काय होत आहे यावर कतरिनाला विश्वासच बसत नव्हता. तू माझ्याशी लग्न कर असे ती त्याला समजावत होती. पण तरीही तो नकारच देत होता. त्याच्या या नकारावर केवळ कतरिनानेच नव्हे तर सलमान खानने देखील आश्चर्य व्यक्त केले.कतरिना कैफने आकाश मित्राला सांगितले की, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासोबत लग्न करण्याची माझी इच्छा आहे. पण आकाश मित्रा या छोट्या मुलाने खूप विचार करून तिला प्रामाणिकपणे सांगितले की, तू माझ्या वयाची नाहीये आणि त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकणार नाही, या मुळे कतरिना खूपच निराश झाली होती.Also Read : सलमान खान सांगतोय, सुभाष घईने माझ्या शूजवर केले होते मुत्रविसर्जन