Join us  

फॅशन न्यारी, फजिती भारी...! ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसने वाढवले कतरीना कैफचे टेन्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 11:47 AM

‘सूर्यवंशी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी कॅटने ऑरेंज बॉडीकॉन ड्रेस निवडला आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पण...

ठळक मुद्दे ‘सूर्यवंशी’मध्ये नीना गुप्ता, गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेत्री कतरीना कैफ फॅशनच्या बाबतीत अन्य अभिनेत्रींना टक्कर देते. आता कालच्या एका इव्हेंटचेच बघा. होय, ‘सूर्यवंशी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी कॅटने ऑरेंज बॉडीकॉन ड्रेस निवडला आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या ड्रेसमध्ये कतरीना कमालीची सुंदर दिसत होती. पण हाच ड्रेस कतरीनाची फजिती करणारा ठरला. ‘सूर्यवंशी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये खाली जमिनीवर बसण्याची वेळ आली अन् कतरीनाला जाम टेन्शन आले. ‘सूर्यवंशी’च्या ट्रेलर लॉन्चमध्ये अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, करण जोहर, रोहित शेट्टी आणि कतरीना असे सगळे जमले. साहजिकच सगळ्यांनी धम्माल मस्ती केली. स्टेजवर बसायला खुर्च्या नाहीत, हे पाहून अक्षय, अजय, रोहित, रणवीर असे सगळे खाली जमिनीवर बसले. पण इथेच गोची झाली. खाली बसायचे म्हटल्यावर कतरीनाला जाम टेन्शन आले. कारण काय तर तिचा ड्रेस.

बॉडीकॉन ड्रेसमध्ये जमिनीवर बसणे शक्यच नव्हते. मग काय सगळेच तिची मज्जा घ्यायला लागले. सगळे मज्जा घेत आहेत म्हटल्यावर कतरीनाही फजिती होणार नाही, याचा पुरेपूर काळजी घेत एकदाची खाली बसली. पण ड्रेसमुळे तिला काही केल्या ती कम्फर्टेबल बसू शकत नव्हती.

बिचा-या कतरीनाची ही अवघडलेली स्थिती बघून अखेर करण जोहर तिच्या मदतीला धावला. ती अनकम्फर्टेबल आहे म्हटल्यावर त्याने सर्वांना उभे राहून मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची विनंती केली. मग काय, बिचा-या कतरीनासाठी सगळे उठून उभे झालेत आणि सर्वांनी धम्माल मस्ती करत मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. ‘सूर्यवंशी’मध्ये नीना गुप्ता, गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफसूर्यवंशीअक्षय कुमारकरण जोहर