Join us  

कतरिना कैफने असा साजरा केला लाडक्या नवरोबाचा वाढदिवस, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 4:12 PM

सेलिब्रिटींचं बर्थ डे सेलिब्रेशन थो़डं खास असतं, थोडं हटके असतं.

सेलिब्रिटींचं बर्थ डे सेलिब्रेशन थो़डं खास असतं, थोडं हटके असतं. अभिनेता विकी कौशलचा ३६वा वाढदिवस १६ मे रोजी झाला.  सोशल मीडियावर  सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी पोस्ट करून विकीला शुभेच्छा दिल्या. सारा अली खान, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, रश्मिका मंदान्ना आणि क्रिती सेनॉनसह अनेक सेलिब्रिटींनीही विकीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर लाडक्या नवरोबाचा वाढदिवस कतरिना कैफने खास बनवला. 

विकी कौशलच्या वाढदिवशी पत्नी कतरिना कैफने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक सेलिब्रेशन पोस्ट शेअर केली. यावेळी तिनं काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो लंडनमधील एका रेस्टॉरंटचे आहेत, जिथे कतरिनाने विकीचा वाढदिवस साजरा केला. फोटोंमध्ये, विकी हा रेस्टॉरंटच्या डिनर टेबलवर बसलेला दिसतोय. तर एका फोटोत त्याच्यासमोर प्लेटमध्ये केक ठेवला आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने व्हाईट हार्ड आणि केकची इमोजी शेअर केली आहे.

विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'छावा' या चित्रपटात दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या या चित्रपटात विकी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत झळकणार आहे. 'छावा'मध्ये अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका ही छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी पत्नी येसूबाई भोसलेची भूमिका साकारत आहे. दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सद्वारे 'छावा' सिनेमाची निर्मिती केली जात आहे. येत्या 6 डिसेंबर 2024 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाविकी कौशल