Join us

विकी कौशल होणार बाबा? कतरिना कैफने लपवला बेबी बंप? व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:23 IST

सिद्धार्थ‑कियारा नंतर कतरिना‑विकी देणार 'गोड बातमी'?

 Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. या दोघांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळवलं आहे आणि लाखोंचा चाहतावर्ग निर्माण केलाय.  दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशातच  कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कतरिना कैफ गरोदर असल्याचा अंदाज बांधला आहे.

विकी आणि कतरिनाच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोघंही बोटीवर जाताना दिसत आहेत. कतरिनानं पांढऱ्या रंगाचा सैल शर्ट परिधान केला होता. तर विकी कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता. दोघांचेही चेहरे मास्कने झाकलेले होते. दोघेही मुंबईहून अलिबागला जात होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून "कतरिना गरोदर आहे का?" असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर कतरिना तिचा 'बेबी बंप' लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. दरम्यान, कतरिना ही गेल्या खूप काळापासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहतेय.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी एकमेंकाची जीवनसाथी म्हणून निवड केली. लग्न होईपर्यंत दोघांनीही त्यांचे नाते उघड केले नव्हते. चाहते या जोडप्याला 'विकॅट' म्हणूनही ओळखतात. मात्र आजपर्यंत दोघांनीही स्क्रीन शेअर केलेली नाही. दोघांच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत.  अलिकडेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांना मुलगी झाली आहे. सिद्धार्थ-कियारा नंतर आता कतरिना-विकी 'गोड बातमी' देणार आहे का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलअलिबागप्रेग्नंसी