Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानसोबत कॉफी डेटवर जाण्याची कार्तिक आर्यनलाही झालीय घाई ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 11:05 IST

सारा अली खानला कार्तिक आर्यन आवडतो हे आता सगळ्यांचा माहिती आहे. साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यावर कार्तिकने काही रिप्लॉय दिला नव्हता.

ठळक मुद्देअमृता सिंगने साराला कार्तिकला संपर्क न करण्याचा सल्ला दिला होताकार्तिकला सुद्धा सारासोबत डेटवर जाण्याची घ्याई लागली आहे

सारा अली खानलाकार्तिक आर्यन आवडतो हे आता सगळ्यांचा माहिती आहे. साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यावर कार्तिकने काही रिप्लॉय दिला नव्हता. त्यानंतर साराची आई अमृता सिंगने तिला कार्तिकला संपर्क न करण्याचा सल्ला दिला होता जर कार्तिक सारामध्ये इंटेरेस्टेड असेल तर तो येईन सांगेल.       

यासगळ्यावर कार्तिकने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिक म्हणाला, ''हो मी ऐकले आहे की साराला माझ्यासोबत कॉफी डेटवर यायाचे आहे. सध्या साराची आईने तिला माझ्याशी न बोलण्याचा सल्ला आहे. मी सारा सांगू इच्छितो की मी तिच्यासोबत कॉफी डेटवर येण्यासाठी तयार आहे. तिने फक्त मला वेळ आणि जागा सांगावी मी त्याठिकाणी पोहोचेन.'' यावरुन एक गोष्ट तर स्पष्ट होते कार्तिकला सुद्धा सारासोबत डेटवर जाण्याची घ्याई लागली आहे.

सारा आणि कार्तिक चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, १९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या  रिमेकमध्ये कार्तिक दिसणार आहे. या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन ‘लव आजकल’च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि कार्तिकच्या अपोझिट आम्ही साराचे नाव निश्चित केले आहे, असे इम्तियाज अलीने एका मुलाखतीत सांगितले होते. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा होईल असे कळतेय.

टॅग्स :कार्तिक आर्यनसारा अली खान