Join us

आणखी एका सिनेमात अक्षय कुमारला रिप्लेस करण्याच्या तयारी कार्तिक आर्यन, मिळाला मोठा प्रोजेक्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 18:23 IST

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने या फ्रॅंचायजीमध्ये अक्षय कुमारची जागा घेतली होती. आपल्या दमदार कामाने कार्तिकने सर्वांनाच चकित केलं आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा होत  आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या 'भुल भुलैया २' चं सक्सेस एन्जॉय करत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्ड तोड कमाई करत सर्वांनाच शॉक्ड केलं आहे. हा सिनेमा काही दिवसातच १०० कोटीच्या क्लबमध्ये सामिल झाला. कार्तिक आर्यनने या फ्रॅंचायजीमध्ये अक्षय कुमारची जागा घेतली होती. आपल्या दमदार कामाने कार्तिकने सर्वांनाच चकित केलं आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा होत  आहे. आता रिपोर्ट्स समोर येत आहेत की, कार्तिक आर्यन लवकरच अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आणखी एका फ्रॅंचायजी सिनेमाचा भाग होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार कार्तिक आर्यन लवकरच 'हाउसफुल' फ्रॅंचायजीमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमार एकुलता एक असा अभिनेता आहे जो 'हाउसफुल' च्या चारही पार्ट्समध्ये दिसला होता. इतर कलाकार यात बदलले होते. मल्टी स्टारर या सिनेमात कार्तिक आर्यन अक्षय कुमारची जागा घेताना दिसू शकतो. पण अजून याबाबत काहीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

कार्तिक आर्यनच्या 'भुल भुलैया २' सिनेमा कंगना रणौतच्या 'धाकड' सिनेमासोबत रिलीज झाला होता. कंगनाचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला होता. कार्तिक आर्यनची जादू प्रेक्षकांवर चालताना दिसत आहे. या सिनेमाने आापर्यंत १२८ कोटी रूपयांची कमाई केली आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या सिनेमात तबू, कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर अनेक सिनेमे पाइपलाईनमध्ये आहेत. कार्तिक आर्यन 'शहजादा' सिनेमात दिसणार आहे. यात तो क्रिकेटरच्या भूमिकेत दिसेल. शहजादा ४ नोव्हेंबर २०२२ रिलीज होत आहे.  तसेच तो 'फ्रॅडी' सिनेमातही दिसणार आहे.  

टॅग्स :कार्तिक आर्यनअक्षय कुमार