Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिश्मा कपूर, बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत राहणार एकाच घरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:58 IST

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या चांगलीच खूश आहे. तिच्या आनंदासाठी दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे बहीण करीनाला होणारे ...

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या चांगलीच खूश आहे. तिच्या आनंदासाठी दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे बहीण करीनाला होणारे बाळ व दुसरे म्हणजे तिचा बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवाल यांच्या सोबतचे नाते ती समोर घेऊन जाऊ इच्छिते. दोघेही लवकरच एकाच घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून करिश्मा कपूरचे नाव संदीप तोष्णीवाल याच्याशी जोडले जात होते. आता दोघेही एकत्र राहण्याचे प्लॅनिंग करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका बेवसाईटवर झळकलेल्या बातमीनुसार करिश्मा व संदीप आपल्या नात्याला नवे रूप देऊ इच्छितात. दोघेही सोबत राहण्याचा विचार करीत असून, संदीप नव्या घराचा शोध घेत आहे. हे घर तो करिश्माला गिफ्ट करणार असल्याचे सांगण्यात येते. या नव्या घरात करिश्मा आपल्या समैरा व कियान या मुलांसह संदीपच्या नव्या घरी राहू शकते. करिना कपूरची प्रमुख भूमिका असलेला ह्यकी अँड काह्ण या चित्रपटाच्या पार्टीमध्ये संदीप व करिश्मा एकत्र दिसले होते. दोघेही या पार्टीत एकत्र आल्याची चर्चा रंगली होती. दोघांची भेट त्यांच्या कॉमन मित्राने घडवून आणली होती. तेव्हापासून दोघांमधील भेटी वाढल्या होत्या. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते. करिश्माच्या कठीण काळात संदीपने तिला आधार दिला होता असे सांगण्यात येते. यावर्षी जून महिन्यात करिश्मा कपूर हिने उद्योगपती संजय कपूर यांच्यात आधिकारिकरित्या घटस्फोट घेतला होता. क रिश्मा व संजयमधील वाद अतिशय विकोपाला गेला होता. मात्र घटस्फोट घेताना दोघांनी समजूतदारी दाखविली व करिश्माने संजयवर लावलेले सर्व मागे घेतले. दुसरीकडे संदीप तोष्णीवाल विवाहित असून, त्याने पत्नी अश्रिताला घटस्फोट देणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. त्यांने अर्शिताला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात अर्ज केला असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे अश्रिताने संदीपवर धोका देण्याचा आरोप केला असून यासाठी करिश्माला जबाबदार धरले आहे.