Join us

प्रेग्नेंन्सी दरम्यान करिना कपूरने दिल्लीत पूर्ण केले 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग, पुढच्या वर्षी येणार भेटीला

By गीतांजली | Updated: October 15, 2020 17:24 IST

करिनासोबत या सिनेमाची शूटिंग आमिर खान करत होता.

 काही दिवसांपूर्वी करिना कपूर खान आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगसाठी सैफ अली खान आणि तैमूरसोबत दिल्लीला रवाना झाली होती. रिपोर्टनुसार करिनाने लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले आहे.  

लॉकडाऊन दरम्यान करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे ती अशा अवस्थेत राहिलेले शूटिंग कसं पूर्ण करेल असा प्रश्न पडला होता. करिनाने सर्व आवश्यक नियमांचे पालन करत शूट केले. विशेष म्हणजे, करिनाची प्रेग्नेंन्सी लक्षात घेत शूटिंग दरम्यान सावधगिरी बाळगत सुरक्षेच्या नियामांची काळजी घेतली गेली. 

सिनेमाची कथाकरिनासोबत या सिनेमाची शूटिंग आमिर खान करत होता. 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. आधी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

याशिवाय करिना कपूरने करण जोहरचा मल्टी-स्टारर 'तख्त'सुद्धा साईन केला आहे. या सिनेमात अनिल कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरआमिर खान