करिना कपूरने प्रेगनन्सीमध्ये या किम कर्दाशियनला केले कॉपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:38 IST
करीनाने नुकताच एका क्युट मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या नावावरुन सध्या नेटिझन्समध्ये बरीच चर्चा रंगली आहे. तर करीना कपूरची ...
करिना कपूरने प्रेगनन्सीमध्ये या किम कर्दाशियनला केले कॉपी
करीनाने नुकताच एका क्युट मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या नावावरुन सध्या नेटिझन्समध्ये बरीच चर्चा रंगली आहे. तर करीना कपूरची प्रेगनन्सी पण चांगलीच गाजली आहे. आजपर्यंत प्रेगनन्ट असलेल्या अभिनेत्री फारशा कधी मिडिया समोर आल्या नाहीत किंवा कोणत्या कार्यक्रमात देखील त्या दिसल्या जास्त दिसल्या नाहीत. परंतू करीना गरोदर असल्या पासूनच चर्चेत राहीली होती. करीनाने गरोदरपणात शूटिंग केली, कार्यक्रमानां उपस्थिती दशर्विली, जाहीराती केल्या, मॅगझीन फाटोशूट केले, रॅम्पवर जलवे दाखविले, पार्टीज अटेंड केल्या... करीनाने काय काय केले नाही. सोशलसाईट्सवर तर करीनीची स्टाईल ट्रेंड झाली होती. बेबी बंप दाखवत करीना एकदम स्टायलीश कपड्यांमध्ये सगळीकडे मिरवत होती. करीनाची प्रेगनन्सीमधील फॅशन देखील फॉर्ममध्ये होती. करीनाच्या या फॅशनचे बºयाच जणांनी कौतुक देखील केले होते. परंू करीनाची ही फॅशन आली कुठून हे तुम्हाला माहितीय का? करीनाने चक्क हॉलिवूडची नायिका किम कर्दाशियनची फॅशन कॉपी केल्याचे नुकतेच समोर आले आहे. किमने तिच्या गरोदरपणात घातलेले कपडे अगदी करीनाच्या बºयाच कपडयांशी मिळते जुळते असल्याचे काही फोटोज मधून दिसत आहे. कपड्यांची स्टाईल, रंग तर तंतोतंत मॅच होताना दिसत आहे. मग आता हा योगायोग समजावा की या पतौडी बहूने खरंच किमला कॉपी केले हे तर करीनाच सांगू शकेल. परंतू सोशल साईट्सवर व्हायरल झालेले काही फोटो पाहता किमला करीनाने कॉपी केले असेच म्हणावे लागेल. आता चर्चेत राहण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. परंतू करीनाने सोशलसाईटस्वर आता काही लपुन राहत नाही याचा तरी विचार करायला हवा होता. किम आणि करीनाचे ड्रेस जरी सेम असले तरी ही करीना मात्र तिच्या या ड्रेसमध्ये खुपच सुंदर दिसत होती हे काही नाकारता येणार नाही. नुकती यमी मम्मी झालेली करीना आता बाळंतपणानंतर कशा लुकमध्ये दिसते हे पाहणे देखील औत्सुक्याचे असणार आहे.