Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणधीर कपूर सांगतायेत, करिना कपूरचे बाऴ दिसते घरातील या सदस्यासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 14:46 IST

करिना आणि सैफला बाळ झाल्यापासून त्यांचे बाळ कसे दिसते याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे.

ठळक मुद्देरणधीर यांनी टाईम्स ग्रुपशी बोलताना सांगितले की, सगळ्यांचे म्हणणे आहे की, बाळ अगदी त्याच्या मोठ्या भावासारखे म्हणजेच तैमुर सारखे दिसते.

सैफ अली खान व करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. करिना कपूरने काल सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला. दुसऱ्या बाळाच्या जन्माने पतौडी आणि कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. पतौडी आणि कपूर कुटुंबातील मंडळी आपल्या लाडक्या बाळाला पाहाण्यासाठी रुग्णालयात जात आहेत.

करिना आणि सैफला बाळ झाल्यापासून त्यांचे बाळ कसे दिसते याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. करिना आणि सैफचे बाळ कसे दिसते हे नुकतेच करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी सांगितले आहे. रणधीर यांनी टाईम्स ग्रुपशी बोलताना सांगितले की, सगळीच बाळं सारखीच दिसतात. त्यामुळे बाळ कोणासारखे दिसते हे मला सांगता येणार नाही. पण सगळ्यांचे म्हणणे आहे की, बाळ अगदी त्याच्या मोठ्या भावासारखे म्हणजेच तैमुर सारखे दिसते. छोट्या बाळाच्या आगमनामुळे तैमुर प्रचंड खूश झाला आहे. 

दुसरीकडे सोशल मीडियावर सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन, याची चर्चा सुरु झाली आहे. बेबो आपल्या दुस-या मुलाचे नाव काय ठेवणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तूर्तास तरी बेबो बाळाच्या नावाचा खुलासा करणार नसल्याचे कळतेय. 

पहिल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याचे जाहीर करताच करिना व सैफ प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर या नावावरून मोठा वादही झाला होता. यापासून धडा घेत सैफिना यावेळी बाळाचे नाव जाहीर करताना सतर्कता बाळगणार असल्याचे समजतेय. ‘व्हॉट वुमन वॉन्ट्स’ या नेहा धूपियाच्या टॉक शोमध्ये खुद्द बेबोने याचे संकेत दिले होते. बाळाचे नाव काय ठेवणार? असे नेहाने विचारले असतात, मी याबद्दल सर्वात शेवटी बोलणार, असे ती म्हणाली होती.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान