Join us
Daily Top 2Weekly Top 5

करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

By तेजल गावडे | Updated: October 28, 2020 18:34 IST

करीना कपूर प्रेग्नेंट असून ती लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूर खान दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून तिला पाच महिन्यहून जास्त दिवस झाले आहेत. यादरम्यान करीनाचे वजन खूप वाढले आहे. करीना प्रेग्नेंसीबाबत उत्सुक आहे. ती नुकतीच स्पॉट झाली आहे. ज्यात तिचे बेबी बंप दिसत आहे. करीना कपूर यादरम्यान गुलाबी रंगाचा प्रिटेंड फुल स्लीव आउटफिट परिधान केले होते. ती तिच्या कारमधून घरी जाताना स्पॉट झाली. यावेळी तिने तोंडावर मास्कही लावला होता. 

बेबी बंपमुळे करीना कपूर खूप आरामात कारमधून बाहेर पडली आणि हळूहळू चालताना दिसली. तिने तिचे केस मोकळे ठेवले होते. जे तिच्या खांद्यावर आले होते.यावेळी करीना कपूर खानच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती तिची आणि होणाऱ्या बाळाच्या स्वास्थ्यासाठी योगादेखील करते आहे.

करीना कपूरने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवर प्रेग्नेंसीला पाच महिने पूर्ण झाल्याची माहिती दिली आणि त्याबद्दल उत्सुक असल्याचेही सांगितले होते. करीना कपूरने आपल्या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, पाच महिने होत आहेत आणि स्ट्रॉंग बनत चालली आहे.

करीनाचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. १२ ऑगस्टला करीना आणि तिचा नवरा अभिनेता सैफ अली खानने त्यांच्या कुटुंबात येणाऱ्या नव्या सदस्याबद्दल सांगितले होते.

काही दिवसांपूर्वीच करिना 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण करुन दिल्लीवरुन मुंबईत परतली आली आहे. या सिनेमात करिना आणि आमिर खानची मुख्य भूमिका असणार आहे.

टॅग्स :करिना कपूर