Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG!  भाची समायराच्या ‘या’ वेडापायी त्रासली करिना कपूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 08:00 IST

करिश्माचे दोन्ही मुले समायरा व कियान यांच्यासोबत करिना अनेकदा दिसते.  पण अलीकडे 14 वर्षांच्या भाचीचे वागणे करिनाला खटकू लागले आहे.

ठळक मुद्देकरिना स्वत: सोशल मीडियावर नाही. अर्थात तिची टीम तिच्याबद्दलचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करते.

करिना कपूर तिची मोठी बहीण करिश्मा कपूर आणि भाची समायरा यांच्या अतिशय जवळ आहे. करिश्माचे दोन्ही मुले समायरा व कियान यांच्यासोबत करिना अनेकदा दिसते.  पण अलीकडे 14 वर्षांच्या भाचीचे वागणे करिनाला खटकू लागले आहे. होय, समायरा सतत मोबाईलला  चिपकून असते. समायराला असे बघितले की, करिनाचा पारा चढतो.होय, अलीकडे एका चॅट शोमध्ये करिनाने स्वत: याचा खुलासा केला. सुपर मॉम या नात्याने तू तुझी भाची समायराला काय सल्ला देशील? असा प्रश्न करिनाला या शोमध्ये विचारण्यात आला. यावर करिनाने समायराच्या सोशल मीडियाच्या ‘व्यसना’बद्दल सांगितले. 

‘माझ्या बहीणीची 14 वर्षांची मुलगी आहे. ती बहुतांश वेळ सोशल मीडियावर घालवते. स्रॅपचॅट व अन्य सोशल साईटवर ती तासन्तास बिझी असते. तिला असे पाहिले की, माझी चिडचिड होते. समायराचे हे व्यसन कमी करायला हवे, असे मी लोलोला (करिश्मा कपूर) सांगितले आहे. कारण सोशल मीडियाच्या नादात तुम्ही तासन् तास एकाच ठिकाणी बसून राहता. ना तुम्ही पुस्तके वाचत, ना बाहेरचे जग जाणून घेण्याचा प्रयत्न करत. कुटुंब, मित्र आपोआप दुरावतात. सोशल मीडिया काळाची गरज असेलही. पण त्याचा वापर एका मर्यादेत व्हायला हवा,’ असे करिना यावेळी म्हणाली.

तुम्हाला माहित असेलच की, करिना स्वत: सोशल मीडियावर नाही. अर्थात तिची टीम तिच्याबद्दलचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करते. करिश्मा मात्र सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. करिनाचे अनेक फोटो व व्हिडीओ ती तिच्या अकाऊंटवर शेअर करत असते.

टॅग्स :करिना कपूरकरिश्मा कपूर