करिना झाली हॉस्पिटलमध्ये भरती; लवकर देणार बाळाला जन्म?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 20:40 IST
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. एका संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार करिनाला पोटात दुखत असल्याने ...
करिना झाली हॉस्पिटलमध्ये भरती; लवकर देणार बाळाला जन्म?
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. एका संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार करिनाला पोटात दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लवकरच करिना आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सैफचे हे तिसरे आपत्य असेल. करिनाची ड्यू डेट ४ डिसेंबर असल्याचे सांगण्यात येते येथे हे विशेष. करिना गरोदर असल्यापासूनच येणाºया पाहुण्यासाठी उत्सुक होती. यासोबतच तिने आपली प्रेग्नेंसी चांगलीच एन्जॉय केली आहे. बॉलिवूडमध्ये प्रेग्नेंसी ट्रेन्ड आणण्याचे श्रेय देखील करिनाला मिळते. तिच्या गरोदरपणाच्या बातम्या मीडियात सर्वाधिक चर्चिल्या जात आहेत. यातच करिनाने प्रेग्नेंसी दरम्यान केलेले विविध फोटोशूटमुळे चर्चेत होती. करिना व सैफच्या बाळाची पतौडी कुटुंबियांना देखील बरीच उत्सुकता आहे. दरम्यान, करिनाची सासू शर्मिला टागोरने तिला परदेशात बाळंतपण नको असे सांगितल्याच्या बातम्या येत होत्या. आता लवकरच पतौडी कुटुंबात नवा वारसदार येणार असल्याने कपूर खानदानातही आनंदाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येते. मीडियातही करिनाच्या बाळाची तेवढीच उत्सुकता लागली आहे. सैफ अली खान व करिनाने १६ आॅक्टोबर २०१२ मध्ये लग्न केले होते. सैफचे हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंग असून, दोघांत आता घटस्फोट झाला आहे. सैफला अमृतापासून सारा व अब्राहम ही दोन मुले आहेत. सारा लवकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. सैफ व करिना यांच्या जोडीला मीडियात व बॉलिवूडमध्ये ‘सैफिना’ या नावाने ओळखले जाते. दोघांच्या प्रेमाची सुरुवात ‘यशराज फिल्म्स’च्या २००८ साली आलेल्या ‘टशन’च्या शूटिंग दरम्यान झाली होती. करिनाने नुकतेच एका मुलाखतीमध्ये आपल्या बाळाचे नाव ‘सैफिना’ असून शकते असे सांगितले होते. सोबतच त्याचे नाव इतिहासाशी संबधित असेल असेही म्हणाली होती. तुर्तास आपण करिनाच्या गोड बातमीची प्रतिक्षा करूयात!