आज अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी अदिराचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी करण त्याच्या दोन्ही मुलांना बर्थ डे पार्टीत घेऊन आला होता. या पार्टीत करिनाचा लाडका तैमूरही उपस्थित होता. वास्तविक करण त्याच्या दोन्ही मुलांना तैमुरला त्याच्या वाढदिवशी भेटवू इच्छित होता. परंतु याची संधी त्याला अदिराच्या वाढदिवशीच मिळाली. आश्चर्याची बाब म्हणजे तैमूर, यश आणि रूही एकमेकांना भेटून खूपच आनंदी झाल्याचे दिसून आले. तिघांनाही एकमेकांची कंपनी खूपच आवडली. यावेळी त्यांनी एकमेकांची कंपनी खूपच एन्जॉय केली.
तैमरने पार्टीत पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता. या लूकमध्ये तो खूपच क्यूट दिसत होता. तर यश आणि रूहीने निळ्या आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या लूकमध्ये दोघे खूप सुंदर दिसत होते. करणने या तिघांचा एकत्रित फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. फोटोला कॅप्शन देताना करणने लिहिले की, ‘नव्या मैत्रीला सुरुवात’ दरम्यान, अदिराच्या बर्थ डे पार्टीत शाहरूख खानचा मुलगा अबराम खान, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य हेदेखील उपस्थित होते.