Join us  

Karan Johar : “मला अनुष्का शर्माचं करिअर उद्ध्वस्त करायचं होतं...”, करण जोहरने सर्वांसमोर दिलेली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 4:35 PM

Karan Johar, Anushka Sharma : '... तर अनुष्का शर्माचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपलं असतं...

अनुष्का शर्मा आज आघाडीची अभिनेत्री आहे. केवळ अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी निर्मातीही आहे. पहिल्याच सिनेमात अनुष्काला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. रब ने बना दी जोडी या सिनेमात ती किंगखानसोबत झळकली अन् यानंतर तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. बँड बाजा बारात, पीके, परी, ऐ दिल है मुश्किल अशा एकापेक्षा एक हिट सिनेमांत ती झळकली. पण त्याआधी असं काही घडलं होतं की, कदाचित अनुष्काचं करिअर सुरू होण्याआधीच संपलं असतं. होय, यशराजचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राने करण जोहरचं ऐकलं असतं तर अनुष्काचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं. हा आमचा दावा नाही नाही तर खुद्द करण जोहरने आपल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. स्वत: करणने ही गोष्ट कबुल केली होती. २०१६ च्या १८ व्या मामी फेस्टिव्हलमध्ये करण जोहरने याबद्दल कबुली दिली होती. याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.  

त्यावेळी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने चित्रपटातील कलाकारांसह हजेरी लावली होती. या व्हिडीओत करण म्हणतो, “मला अनुष्का शर्माचं करिअर खरंच उद्ध्वस्त करायचं होतं. कारण जेव्हा मला आदित्य चोप्राने तिचा फोटो दाखवला तेव्हाच तू वेडा झाला आहेस का? असं मी त्याला म्हणालो होतो. अनुष्काला अजिबता घेऊ नकोस असा सल्ला मी आदित्यला दिला होता. त्यावेळी अनुष्काच्या ऐवजी माझ्या डोक्यात वेगळ्याच अभिनेत्रीचं नाव होतं. आदित्यने तिला साईन् करावं असं माझ्या मनात होतं. मी आदित्यचं अनेक पद्धतीने मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. पण यानंतर मी अनुष्काचा बॅन्ड बाजा बारात हा सिनेमा पाहिला आणि स्वतः अनुष्काला फोन केला. तिची माफी मागून तिचं कौतुक करायलाच हवं, असं मला वाटलं. तिच्यासारख्या उत्कृष्ट अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो.”रिपोर्टनुसार, ‘रब ने बना दी जोडी’मध्ये आदित्य चोप्रानने अनुष्काऐवजी सोनम कपूरला घ्यावं अशी करणची इच्छा होती. पण त्यावेळी आदित्य चोप्राने करण जोहरचा सल्ला न मानता अनुष्कालाच सिनेमात घेतलं.   

पुन्हा ट्रोलकरणचा हा व्हिडिओ रेडिटवर व्हायरल होत आहे. साहजिकच अनेकजण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर करणला ट्राेल करत आहेत. “हा जर अनुष्का शर्माच्या करिअरबद्दल असा विचार करू शकतो तर विचार करा की याने आणखी किती लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केलंअसेल.” अशी कॉमेंट करत एका युझरने केली आहे.   

टॅग्स :करण जोहरअनुष्का शर्माबॉलिवूड